बिहार विधानसभा निवडणूक : मोदींच्या सभांत नितीशकुमारही व्यासपीठावर येणार - Nitesh Kumar will Share dias with PM Modi in Bihar Elections Campaign | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

बिहार विधानसभा निवडणूक : मोदींच्या सभांत नितीशकुमारही व्यासपीठावर येणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

भाजप आघाडीतून बिहारमध्ये बाहेर पडलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला भाजपच्या छुप्या मदतीची चर्चा अद्याप थांबलेली नाही. हा संशयकल्लोळ सावरण्यासाठी मोदींच्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या रणधुमाळीत भाजप प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वतःच्या हाती घेणार असून येत्या २३ ऑक्‍टोबरपासून ते राज्यात १२ निवडणूक प्रचारसभा करतील. पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

२८ ऑक्‍टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणुका होणाऱ्या बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जदयू व लालूप्रसाद यांचा राजद या दोन्ही आघाड्यांमधील रणधुमाळी रंगात आली आहे. भाजप व कॉंग्रेस तेथे दुय्यम भूमिकेत आहेत. त्यातच कॉंग्रेसने एका जिना समर्थकाला दरभंगा जिल्ह्यातून उमेदवारी दिल्याने तो वादाचा विषय ठरला आहे.

भाजप आघाडीतून बिहारमध्ये बाहेर पडलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला भाजपच्या छुप्या मदतीची चर्चा अद्याप थांबलेली नाही. हा संशयकल्लोळ सावरण्यासाठी मोदींच्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येणार आहे.

एनडीएने रिपोर्ट कार्डही जारी केले आहे. विकास हाच एनडीएचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. भाजपच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रकृती अस्वास्थ्यामुळे फारसे सक्रिय राहू शकणार नसल्याचे सांगितले जाते. मोदी व त्यांच्याशिवाय भाजपकडे साऱ्या बिहारवर प्रबाव पाडणारा दुसरा नेता नाही. त्यामुळेच मोदींच्या सभांची संख्या वाढविण्यात आल्याचे समजते.

मोदींच्या सभांचा कार्यक्रम 
२३ ऑक्‍टोबर- सासाराम, गया व भागलपुर.
२८ ऑक्‍टोबर-दरभंगा,मुजफ्फरपूर व पाटणा
एक नोव्हेंबर -छपरा, पूर्व चंपारण्य व समस्तीपूर
तीन नोव्हेंबर पश्‍चिम चंपारण्य, सहरसा व फ़ारबिसगंज

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख