नीरव मोदीचा मुक्काम बँरेक क्रमांक 12 मध्ये...

नीरव मोदीला भारतात आणले जाणार आहे. त्याला मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात (आर्थर रोड जेल) ठेवण्यात येणार आहे.
nirav26.jpg
nirav26.jpg

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटीश सरकारकडून परवानगी मिळाली आहे. भारतातील तुरुंगाची स्थिती चांगली नसल्याचे नीरव मोदीकडून सांगण्यात आले होते. मात्र, आर्थररोड कारागृह हे व्यवस्थित असल्याचे निरीक्षण ब्रिटिश न्यायालयाने नोंदवले आहे.

आर्थररोड कारागृहाच्या बँरेक १२ मध़्ये आता नीरवला ठेवले जाणार आहे. स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्य़कारी अधिकारी पीटर मुखर्जी, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांना याच बँरेक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात आले होते. 

ज्या बँरेकमध्ये नीरवला ठेवले जाणार आहे. त्या बँरेकचा व्हिडिओ ब्रिटीश न्यायालयाला दाखवण्यात आला होता. लवकरच नीरव मोदीला भारतात आणले जाणार आहे. त्याला मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात (आर्थर रोड जेल) ठेवण्यात येणार आहे. व्हिडिओ काँनफरंसिंगद्वारे ही सुनावणी झाली. नीरव मोदीला बँरेक क्रमांक 12 मध्ये ठेवले जाणार असून लंडन येथील न्यायालयात या बँरेकचा व्हिडिओ दाखविण्यात आला होता.

काय आहे बॅरेक क्रमांक 12 ची वैशिष्टे

बँरेक क्रमांक 12 हा आँर्थर रोड कारागृहाचा एक भाग आहे. यात अन्य कैद्यांसारखी गर्दी नसते. बँरेक क्रमांक 12 मध्ये दोन भाग असून एका भागात सहा पैका जास्त कैद्यांना ठेवले जात नाही. बँरेकमध्ये  नैसगिक प्रकाश, मोकळी हवा आहे. या बँरेकमध्ये पाश्चात्य पद्धतीच्या अटैच्ड बाथरूमची सुविधा आहे. येथे शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधाही आहेत. येथील कैद्यांना गादी, उशी, ब्लॅकेट दिले जाते. त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था याठिकाणी आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी आठवड्यातून एकदा या परिसराची पाहणी करतात. स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्य़कारी अधिकारी पीटर मुखर्जी, राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांना याच बँरेक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात आले होते. 
   
हेही वाचा: "नीता भाभी, मुकेश भैया..ये सिर्फ ट्रेलर है...संभल जाना.."
मुंबई : मुंबई प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ऍन्टीलिया या घराजवळ काल (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली आहे. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या आहेत. मुकेश अंबानी हे मुंबईतील या घरातच असल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी जिलेटीन असलेली कार अंबानी यांच्या घराजवळून दूर हटवली आहे. पोलिसांना गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'ये सिर्फ ट्रेलर है.. निता भाभी, मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है ! इंतजाम हो गया है! संभल जाना..' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com