राष्ट्रपतींकडून संसद भंग..मध्यावधी निवडणुका जाहीर..

पंतप्रधान के.पी. शर्मा आणि नेपाळ कॅाग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांचे सरकार स्थापनेचे दावे फेटाळले आहेत.
Sarkarnama Banner - 2021-05-22T123156.247.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-22T123156.247.jpg

नवी दिल्ली : नेपाळमध्ये सत्ता स्थापनेवरुन राजकारण तापलं आहे. राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी संसद भंग केली असून मध्यावधी निवडणुका घेण्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी निवडणुकीची नवीन तारीख घोषित केली आहे. ता. १२ आणि १९ नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका होतील, असं राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.

पंतप्रधान के.पी. शर्मा आणि नेपाळ कॅाग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांचे सरकार स्थापनेचे दावे विद्या देवी भंडारी यांनी फेटाळले आहेत. त्यानंतर संसद भंग करण्यात आली.  नेपाळमध्ये राजकीय घडामोंडीना वेग आला असून ओली आणि विरोधी पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. ओली आणि विरोधी पक्षांच्या खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे सादर केले होते. दोघांनीही नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. दोन्ही पक्षांचे नेते राष्ट्रपती कार्यालयात पोहचले होते. 

नेपाळच्या 275 सदस्यीय प्रतिनिधी सभेत 121 जागांसोबत सीपीएन-यूएमएल सर्वात मोठा पक्ष आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 138 जागांची गरज असते. ओली यांनी 153 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, तर देउबा यांनी त्यांच्या बाजूने 149 खासदार असल्याचा दावा केला. 

घटनेच्या नियमानुसार ओली यांनी पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी आपल्या पक्षाच्या –सीपीएन-यूएमएलच्या 121 सदस्या आणि जनता समाजवादी पक्ष- नेपाळ (जेएसपी-एन) च्या 32 खासदारांनी समर्थनाचे पत्र सादर केले होते.  तर नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांनी 149 खासदारांचे समर्थन असल्याचा दावा राष्ट्रपतींकडे सादर केला होता. घटनेनुसार दोन्ही सरकार स्थापन करु शकत नसल्याने काल रात्री उशिरा राष्ट्रपतींनी संसद भंग करुन मध्यावधी निवडणुकीची तारीख जाहीर केली. 

हेही वाचा :  "सामना"ने छापला कोरोनाला मोदी  जबाबदार नसल्याचे सांगणारा भाजपचा लेख..    
 
मुंबई  : सदासर्वदा, युतीत असताना आणि नसताना टीका करणाऱ्या सामनाने  आपल्या संपादकीय पानावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कैातुक करणारा लेख छापला आहे. शिवाय आज 
" सामना" च्या पहिल्या पानावर 'पंतप्रधान मोदी भावुक झाले ,वाराणसीतील डॉकटरांशी संवाद साधताना त्यांचा कंठ दाटला' अशीही बातमी ठळकपणे प्रसिध्द झाली आहे. या दोन महत्वाच्या बाबींचा काय अर्थ लावायचा असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला आहे. "पंतप्रधानांना दोषी का ठरवता" असे शीर्षक असलेला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लिहिलेला हा लेख आज प्रसिद्ध झाला आहे. पंतप्रधानांवरील आरोपांना उत्तर अशी चौकट करून शेजारीच उपाध्येंचा लेख छापला आहे. "पंतप्रधानांनी सर्व राज्यांना योग्य त्या सूचना पाठवल्या होत्या. काळजी घेतली होती तरीही ते एकटेच जबाबदार कसे," असा प्रश्न या लेखात विचारला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com