देशमुखांवर  ED ची कारवाई म्हणजे..सत्तेचा गैरवापर करून बदनामीचे कारस्थान... - Nawab Malik reaction to ED action against Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुखांवर  ED ची कारवाई म्हणजे..सत्तेचा गैरवापर करून बदनामीचे कारस्थान...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

आघाडी सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे.

मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर अखेर आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  ED ने गुन्हा नोंदवला. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटींच्या कथित आरोपांप्रकरणी ईडीनं हा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईचा निषेध राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी केला आहे. Nawab Malik reaction to ED action against Anil Deshmukh

 
या कारवाईचा निषेध व्यक्त करताना नवाब मलिक म्हणाले, ‘‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल करणे हे राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठीचे कारस्थान आहे.’’ राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेसने या कारवाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.  अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारा भाजपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात 

सत्तेचा गैरवापर करून बदनामी करण्यासाठीचे हे कारस्थान असल्याची टीका ‘राष्ट्रवादी’चे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. तर, हे निव्वळ घाणेरडे राजकारण सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकारण करतेय. आघाडी सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. परंतु, कायदेशीर बाबींच्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील, असे मलिक यांनी सांगितले. 
 

या प्रकरणात या पूर्वीही सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. १०० कोटी वसूलीबाबत ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ईडी चौकशीसाठी देशमुख यांना समन्स करू शकते. अनिल देशुख यांच्या भष्ट्र पद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेलं, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते.   मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिशांची एक सदस्यीय समिती राज्य सरकाने नियुक्त केली आहे. आता या समितीला दिवाणी  अधिकार देण्यात आले आहेत. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख