दानवेंची भूमिका वैयक्तीक असेल तर..मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा.. - Nawab Malik attack on Raosaheb Danve statement agriculture Act | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंची भूमिका वैयक्तीक असेल तर..मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यावा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दानवे यांचे म्हणणे खरे असेल तर अमित शहा व नरेंद्रसिंह तोमर या शेतकऱ्यांशी चर्चा का करीत आहेत, असाही प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. 

मुंबई : "शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी आणि चीन आहेत, असा आरोप करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज येथे केली. 

नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्यामागे खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन आहे, असा दावा नुकताच दानवे यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. दानवे यांचे म्हणणे खरे असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर या शेतकऱ्यांशी चर्चा का करीत आहेत, असाही प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. 

दानवे यांच्या वक्तव्यावर मलिक यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची वैयक्तिक भूमिका आहे हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची अशीच भूमिका असेल तर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठका का घेतल्या, गृहमंत्री अमित शहा देखील शेतकऱ्यांबरोबर बैठका का घेत आहेत, याचे उत्तर मिळावे. सरकारचीच ही भूमिका असेल तर याबाबत आतापर्यंत सरकारने काय केलं आहे, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे,  असे वक्तव्य करून दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. दानवे यांची ही वैयक्तिक भूमिका असेल तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.

हेही वाचा : शेतकऱ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : शरद पवार
मुंबई : "कुठलीही चर्चा न करता कृषी कायदा घाई घाईने मंजूर करण्यात आला आहे. अन्यदात्याच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलतांना सांगितले. कृषी कायद्यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले, "केंद्रीय कृषी कायदा पाठीमागं घ्यावा लागेल, त्यातून तोडगा निघेल. कृषी कायदा लोकसभेत मंजूर करण्याची घाई केली, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याचे लोन देशात सगळीकडे पसरेल का अशी भिती वाटते." आपण यूपीए अध्यक्ष होणार का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की या बातम्या खोट्या आहेत. त्यात तथ्य नाही." शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या विधानाबाबत शरद पवार म्हणाले, "
दानवेंसारखी माणसे काय बोलतात, त्यांना किती महत्व द्यायचे ? 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख