लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा... - Narendra Modi wishes Lata Mangeshkar on her birthday  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस. यानिमित्तानं त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी याबाबत टि्वट करीत गानकोकिळा लता मंगेशकर यांचे अभिष्टचिंतन केलं आहे. लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी नरेंद्र मोदी त्यांना शुभेच्छा देत असतात. 

आपल्या टि्वटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे की मला लता दिदीचे प्रेम आणि आर्शीवाद मिळाला. लता दिदी या आपल्या देशाची ओळख आहे. मध्यप्रदेशातील इंदोर येथे त्यांचा जन्म झाला. लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’ होतं. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा ‘लतिका’वरून त्यांचे नाव ‘लता’ असं ठेवण्यात आलं. 

लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. सध्या संगीत क्षेत्रापासून दूर आहेत. लतादिदींनी 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली होती. कामानिमित्ताने त्या मुंबईत आल्या. त्यांनी संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. लता मंगेशकर यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. सध्या संगीत क्षेत्रापासून त्या दूर आहेत. 

हेही वाचा : पाकिस्तान सरकार करणार  दोन अभिनेत्यांच्या घराचं जतन.. 
 
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार ज्येष्ठ अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतला आहे. अभिनेता राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर पेशावर येथे आहे. या घरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यांचे जतन करण्यासाठी या वास्तू पाकिस्तान सरकारनं विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

खैबर-पख्तूनख्वा येथील पुरातत्व वास्तू विभागाने ही दोन्ही घरे खरेदी करण्यासाठी योग्य रक्कम देण्याची ग्वाही दिली आहे. या दोन्ही वास्तूंना पाकिस्तानची राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. याबाबत पुरातत्व वास्तू विभागाचे प्रमुख डॅा. अब्दुस समद खान यांनी सांगितले की पेशावर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही वास्तूंचे मूल्य निश्चित करण्यासाठी सांगितले आहे. याबाबतचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

राज कपूर आणि दिलीप कुमार यांचे घर पेशावर येथे आहे. या घरातच त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण या घरामध्ये गेलं आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर राज कपूर आणि दिलीप कुमार यांचा परिवार भारतात आला. त्यानंतर या घरांची खूप पडझड झाली आहे. या घराचे जतन करण्यासाठी पाकिस्तान सरकारनं हा निर्णय घेतला आहे. 

पेशावर येथील राज कपूर यांच्या पूर्वजांचे हे घर "कपूर हवेली" म्हणून ओळखली जाते. ही कपूर हवेली ख्वानी बाजार परिसरात आहे. 1918 ते 1922 दरम्यान राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्र्वरनाथ कपूर यांनी ही "कपूर हवेली" बांधली होती. या हवेलीमध्ये राज कपूर आणि त्याचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख