ममता बॅनर्जी CBI वर भडकल्या..म्हणाल्या.."मला पण अटक करा.."

ममता बॅनर्जी सरकारमधील दोन मंत्री, एक माजी मंत्री, एक आमदार यांच्यावर कारवाई केली आहे.
2Sarkarnama_20Banner_20_202021_05_04T151749.913_0.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_05_04T151749.913_0.jpg

कोलकाता : नारदा घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये सीबीआयने  CBI ममता बॅनर्जी सरकारमधील दोन मंत्री, एक माजी मंत्री, एक आमदार यांच्यावर कारवाई केली आहे. टीएमसीचे मंत्री फिरहाद हकीम  (Firhad Hakim), सुब्रत मुखर्जी (Subrata Mukherjee), टीएमसीचे आमदार मदन मित्रा (Madan Mitra), माजी मंत्री सोवन चटर्जी (Sovan Chatterjee) यांना ताब्यात घेतलं आहे.  Narada sting case CBI Questions West Bengal ministers Firhad Hakim Subrata Mukherjee

सीबीआय या चारही जणांची नारदा घोटाळ्याप्रकरणी चैाकशी करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी, खासदार शांतनु सेन हे देखील आहेत.  सीबीआयच्या कार्यालयात गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सीबीआय़च्या अधिकाऱ्यांना भडकल्या. त्यांनी सांगितलं की, ."मला पण अटक करा..." 

सीबीआयच्या पथकासोबत सीआरपीएफचे जवान तैनात आहेत. सीबीआय कार्यालयात तणावाने वातावरण आहे. मदन मित्रा आणि सोमन चटर्जी या दोघांचीही सीबीआयचे अधिकारी चैाकशी करीत आहेत. या चारही नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे, त्यांना अद्याप अटक केली नाही, असे सीबीआयने पत्रकारांना सांगितले. 

पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी म्हणाले की, “सीबीआयने आम्हाला याची (अटकेची) कल्पना दिली नाही. जर त्यांनी अटक केली असेल तर ती बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी यासाठी आवश्यक आहे. पण ती घेण्यात आलेली नाही. हे लोकशाहीला धरून नाही.” पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत शारदा घोटाळा आणि नारदा घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. सीबीआयदेखील या प्रकरणांचा तपास करत आहे. या प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये 2016च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आले होते. 2014 मध्ये या टेप रेकॉर्ड केल्याचा दावा केला जात होता आणि टीएमसीचे मंत्री, खासदार आणि आमदारांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींनी बनावट कंपनीच्या प्रतिनिधींकडून रोख रक्कम घेतल्याचे यात स्पष्ट झाले होते.

राज्यपाल जगदीप धनखड यांनी 9 मे रोजी या चार टीएमसी नेत्यांविरुद्ध सीबीआयला खटला चालविण्यास परवानगी दिली होती. या नेत्यांविरोधात खटला पुढे नेण्याची परवानगी राज्यपालांनी दिलेली आहे. नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी हे स्टिंग ऑपरेशन  केले होते. कोलकाता हायकोर्टाने मार्च 2017मध्ये स्टिंग ऑपरेशनच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. या स्टिंगमध्ये या चारही नेत्यांची नाव जाहीर झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com