राजस्थानमधील काँग्रेस संकटावर नागपूरचे 'औषध' 

लोकसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी पांडे यांच्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सोपवली होती.
avinash-pandey13f.jpg
avinash-pandey13f.jpg

मुंबई : विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतरही राजस्थान तेथे अस्वस्थता कायम होती. ती सोडवण्यासाठी याही वेळी विश्वास टाकला गेला आहे तो नागपूर येथील अविनाश पांडे यांच्यावर. काल रात्री कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीला निरीक्षक म्हणून हजर रहाण्याचा निरोप अविनाश पांडे यांना आला होता. 
लोकसभा निवडणुकांच्या आधी झालेल्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी पांडे यांच्यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी सोपवली होती. सचिन पायलट नकोत तर मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत हवेत या निर्णयातही पांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. रविवारी रात्रीही त्यांनी सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधला होता. आजही ते सरकार वाचेल असे सांगत आहेत.  
 

काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकीला बोलावलं होती. जे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं होतं. सचिन पायलट तूर्तास राजधानी दिल्लीत आहेत. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, अशोक गेहलोत यांना 109 आमदारांचा पाठिंबा आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आजच्या बैठकीलाही पायलट हे अपेक्षेप्रमाणे अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी मात्र, शक्तिप्रदर्शन करण्याची ही संधी सोडली नाही. त्यांनी बैठकीला 90 आमदार जमा केले होते.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला आज सुमारे 90 आमदार हजर होते. ही बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीतून बाहेर पडताना गेहलोत, काँग्रेसचे नेते आणि पक्षाचे आमदार विजयाची खूण करीत होते. त्यामुळे गेहलोत यांनी शक्तिप्रदर्शन करुन पक्षश्रेष्ठींवर दबाव आणल्याचे चित्र आहे. या वेळी पक्षाने पाठविलेले केंद्रीय निरीक्षक रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हेही उपस्थित होते. सचिन पायलट यांच्याशी पक्षाकडून चर्चा सुरू आहे. मागील 48 तासांत अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे सुरजेवाला यांनी सांगितले. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मागील दोन दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसलेल्या पायलट यांनी आता ३० काँग्रेस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सचीन पायलट काय भूमीका घेणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सचीन पायलट हे आता भाजपमध्ये असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस व छत्तीसगढचे प्रभारी पी. एल. पुनिया यांनी केले होते. मात्र, नंतर त्यांनी आपल्याला ज्योतिरादित्य शिंदे म्हणायचे होते, पण चुकीने पायलट यांचे नाव घेतले असा खुलासा त्यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com