बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंग यांची हत्या  - Murder of Janata Dal NCP candidate Narayan Singh in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंग यांची हत्या 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांची हत्या करण्यात आली आहे.

पाटणा : बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांची हत्या करण्यात आली आहे. बाईकवरून आलेल्या दोघांनी नारायण सिंग त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात त्यांचे दोन समर्थकही जखमी झाले आहेत.  

जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह हे शेहोर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघात 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आज हा हिंसाचारही घडला. या घटनेमुळं बिहारच्या निवडणुकीला गालबोट लागलं आहे.

जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असलेले नारायण सिंग हाथसर गावात प्रचार करत होते.  नारायण सिंग यांच्या विरोधात आतापर्यंत 24 गुन्हे दाखल आहे. दुमरी काटाश्री प्रांतातील नया गावचे ते सरपंच होते. त्या काळात त्यांच्यावर सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले होते. नारायण सिंग यांचा मतदारसंघ असलेल्या शेहोरमधून तब्बल 16 उमेदवारांना अर्ज केला आहे. यात राजदचे चेतन आनंद व जदयूचे आमदार मोहम्मद शर्फुद्दीन यांचाही समावेश आहे.

नारायण सिंग यांचा मतदारसंघ असलेल्या शेहोरमधून तब्बल 16 उमेदवारांना अर्ज केला आहे. यात राजदचे चेतन आनंद व जदयूचे आमदार मोहम्मद शर्फुद्दीन यांचाही समावेश आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्प्याच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस उरलेले आहेत.   
 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राजकारण पेटलं..   

रांची : झारखंडचे भाजप प्रदेशाअध्यक्ष आणि खासदार दीपक प्रकाश यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानावर निशाना साधला आहे. "राज्यात बलात्काराच्या वाढत असलेल्या घटनांना कोरोनाचे संकट जबाबदार आहे," असे मुख्यमंत्री सोरेन यांनी शनिवारी म्हटलं होते. या विधानावरून आता राजकारण पेटले आहे. मुख्यमंत्री सोरेन यांच्या या विधानानंतर खासदार दीपक प्रकाश यांनी सांगितले की मुख्य़मंत्री सोरेन यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे, त्यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या घटनांना कोरोनाला जबाबदार धरले आहे. सरकारचे अपयश व आगामी पोटनिवडणूक महाआघाडीचा होणार पराभव लक्षात घेता मुख्यमंत्री असे उलट-सुलट विधाने करीत आहेत. मुख्यमंत्री नागरिकांच्या प्रश्नांना घाबरत आहेत. झारखंड येथे बलाकार व अन्य गुन्हेगारी घटनांबाबत एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितले की कोरोना काळात अनेक गोष्टीमध्ये बदल झाले. पावसाच्या वेळेस ऊन आणि उन्हाळ्यात पाऊस होत आहे. नागरिकांची मनोवृत्तीत बदल होत आहेत. ते विचित्रपणे वागत आहेत. याचा परिणाम बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटना नातेवाईक, मित्र, घरगुती भांडण, जमीन व्यवहार यांच्याशी संबधीत होत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख