उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई सुरक्षितच : अनुराग कश्‍यप 

सुशांतसिंह राजपूतच्या चित्रपटातील अगदी सुरुवातीच्या काळापासून मी त्याला पाहिला आहे. तो खूप चांगला कलाकार होता. कमी काळात खूप मोठे यश त्याला मिळाले होते. मात्र, ते यश त्याला पचवता आले नाही.
Mumbai safe under Uddhav Thackeray: Anurag Kashyap
Mumbai safe under Uddhav Thackeray: Anurag Kashyap

पुणे : कंगनाला हरामखोर शब्द वापरणे चुकीचे आहे. त्याचा मी निषेध करतो. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईचीदेखील ही वेळ नव्हती, असे स्पष्ट करताना मुंबईत मला अजिबात असुरक्षित वाटत नाही.

उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई अत्यंत सुरक्षित आहे, अशी रोखठोक भूमिका निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यांनी मांडली आहे. एका मुलाखतीत कश्‍यप यांनी ठाकरे हे चांगले काम करीत असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. 

खासदार संजय राऊत यांनी असे बोलायला नको होते. ते "ओव्हर रिऍक्‍ट' झाले. त्यांच्या या भाषेचा मी निषेध करतो. राजकारण्यांनी असे शब्द वापरू नयेत. हा सारा सत्तेचा खेळ आहे. यात कंगनानेही पडायला नको होते, असे माझे स्वत:चे मत आहे. ती माझी चांगली मैत्रीण आहे. बेकायदा बांधकाम असेल तर त्यावर कारवाई व्हायला हरकत नाही. मात्र, कंगनाने विशिष्ट मत व्यक्त केल्यानंतर तिच्या कार्यालयाच्या अवैध बांधकामावर कारवाई करणे पूर्णत: चुकीचे असल्याचे कश्‍यप यांनी सांगितले. 

सुशांतसिंह राजपूतच्या चित्रपटातील अगदी सुरुवातीच्या काळापासून मी त्याला पाहिला आहे. तो खूप चांगला कलाकार होता. कमी काळात खूप मोठे यश त्याला मिळाले होते. मात्र, ते यश त्याला पचवता आले नाही. तो फार संवेदनशील होता. दुसऱ्यावर विश्‍वास ठेवणारा होता. त्याला भेटलेले लोक त्याला चुकीच्या दिशेने घेऊन गेले. तो स्वत:देखील आपल्या भूमिकेशी ठाम राहत नव्हता. त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले, असे मत कश्‍यप यांनी मांडले. 

बॉलिवूडमधील अंमली पदार्थांबद्दल बोलले जात आहे. अंमली पदार्थांचे सेवन चुकीचेच आहे. मात्र, त्यासाठी केवळ बॉलिवूडला दोषी ठरविणे योग्य नाही. यावरून बॉलिवूडला "टार्गेट' केले जात आहे. हे मुळात चुकीचे आहे. उत्तर प्रदेश हे भांग आणि गांजाचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे यासाठी केवळ बॉलिवूडला दोषी ठरवणे योग्य नाही.

देशातील अनेक ठिकाणी हे होत आहे. मात्र, बॉलिवूडचीच चर्चा होत आहे. देशात ज्या ठिकाणी हे सारे होत आहे, ते आधी साफ करा. बॉलिवूडमधील अंमली पदार्थांचे सेवनदेखील आपोआप बंद होईल, असे मत कश्‍यप यांनी व्यक्त केले. 

देशात अनेक महत्वाचे प्रश्‍न आहेत. मात्र, माध्यमे विशिष्ट गोष्टीवर जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत. सिमेवर अनेक घडामोडी होत आहेत. बेरोजगारी, कोवीड यासारखे अनेक प्रश्‍न आहेत. मात्र, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी माध्यमांना कोण वापरत आहे. कंगनासारख्यांनाही त्यासाठी बोलायला लावले जात आहे. या सर्वांना कोण "ऑपरेट' करीत आहेत, याचा विचार करण्याची गरज आहे, अशी भूमिका कश्‍यप यांनी मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com