"नीता भाभी, मुकेश भैया..ये सिर्फ ट्रेलर है...संभल जाना.." - Mumbai car gelatin sticks was found near mukesh ambanis house | Politics Marathi News - Sarkarnama

"नीता भाभी, मुकेश भैया..ये सिर्फ ट्रेलर है...संभल जाना.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

पोलिसांना गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'ये सिर्फ ट्रेलर है.. नीता भाभी, मुकेश भैया...फॅमिली.. ये तो झलक है ! इंतजाम हो गया है!संभल जाना..'

मुंबई : मुंबई प्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ऍन्टीलिया या घराजवळ काल (ता. 25 फेब्रुवारी) सायंकाळी संशयित गाडी आढळून आली आहे.

त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या आहेत. मुकेश अंबानी हे मुंबईतील या घरातच असल्याचे समजते. मुंबई पोलिसांनी जिलेटीन असलेली कार अंबानी यांच्या घराजवळून दूर हटवली आहे. पोलिसांना गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, 'ये सिर्फ ट्रेलर है.. नीता भाभी, मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है ! इंतजाम हो गया है!संभल जाना..'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदे व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील यांच्यात काल रात्री उशिरा याबाबत बैठक झाली. बैठकीत मुकेश अंबानी यांच्या घराखाली सापडलेल्या संशयित गाडी प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नागरे पाटील यांना सूचना दिल्या आहेत.  

अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली आहेत. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट झाली आहे. 

रात्री दहशतवादी विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती, आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे. सुपर पावर डेझर एक्सप्लोजिव २५ एम एम, १२५ ग्रँमसोलर, इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 'डो बाजारगाव नागपूर' असे लिहिलेल्या १९ जिलेटिन कांड्या, बनावट नंबर प्लेट आदी साहित्य या गाडीत सापडले आहेत. 

देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईत उच्चभ्रू वस्तीत ऍन्टीला नावाचे घर आहे. या घराच्याजवळ काल सायंकाळी एक संशयित कार आढळून आली आहे. या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्याही असल्याची माहिती पुढे आली आहे. जिलेटनिच्या कांड्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या आहेत. मुंबई पोलिस आणि एसएसजीची टीम अंबानी यांच्या घराजवळ पोचली आहे. संबधित कार पोलिसांनी जागेवरून दूर हटवली आहे. 

मुकेश अंबानी सध्या ऍन्टीला हाऊसमध्येच आहेत. पोलिस आधिकारी अंबानी यांच्या घरी ब्रिफींग देण्यास पोचले आहेत. मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदे व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबईच्या एटीएसचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला. सापडलेली गाडी आणि अंबानी यांच्या गाडीचा क्रमांक एकच असल्याचीही माहिती पुढे येत आहे. 

अंबानी यांना केंद्र सरकारने झेड प्लस ही सुरक्षा दिली आहे. तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थादेखील काटेकोर आहे. शेतकरी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सध्या आंदोलन आहे. या आंदोलनात मुकेश अंबानी आणि अडाणी हे दोन उद्योगपती लक्ष्य करण्यात आले होते. या आंदोलनात खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचा आरोप करण्यता येत होता. ही बाजूपण पोलिस तपासात पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख