#MPSC: Exam postponed .. | Sarkarnama

#MPSC :  परीक्षा पुढं ढकला..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

कक्ष अधिकारी ते सहसचिवांच्या सेवा ज्येष्ठता याद्या सुधारीत कराव्यात, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं असल्याचे पवार यांनी सांगितले. 

पुणे : "कोरोनामुळे एमपीएससीची(MPSC) परीक्षा पुढं ढकलावी," अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. 

एमपीएससीसाठी स्वतंत्र कार्यालय देऊन सदस्य संख्येत वाढ करावी, तसेच प्रलंबित मुलाखती पूर्ण करुन उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, कक्ष अधिकारी ते सहसचिवांच्या सेवा ज्येष्ठता याद्या सुधारीत कराव्यात, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं असल्याचे पवार यांनी सांगितले. 

याशिवाय मोटार वाहन निरीक्षक पदाच्या प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, शहरी भागासाठीही रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एखादी योजना आणावी, गट क सेवा पदांच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल लावावा, गट ब व क मधील रिक्त पदे भरावीत आदी प्रश्नही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी मांडले.

कोरोना, शेती, उद्योग, बांधकाम क्षेत्र, वारकरी व पत्रकारांचे प्रश्न, ई-पास व शिक्षकांच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा केली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे यावेळी पवार यांनी केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं असल्याचे पवार यांनी सांगितलं. याबाबत रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. 
Edited  by : Mangesh Mahale  

हेही वाचा : अभिनेता दिनो मोरिया म्हणतो, माझ्या घरी पार्टीच झाली नाही...
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासावरुन महाराष्ट्र आणि बिहार सरकारमध्ये जुंपली आहे. आता अभिनेता दिनो मोरिया याने या प्रकरणी अखेर खुलासा केला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख