मराठीच्या ‘अभिजात’ दर्जासाठी भाजप खासदाराचे केंद्र सरकारला साकडे 

भाजप सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Sarkarnama Banner - 2021-08-11T133356.703.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-11T133356.703.jpg

अकोला :  जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या दहा भाषांमध्ये मराठीचा Marathi समावेश आहे. या भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळावा म्हणून वेगवेगळ्या पातळीवर व क्षेत्रातून अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे.

महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या भावनांशी जुळलेल्या मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडेच  मागणी लावून धरली आहे. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. त्यामुळे स्वपक्षाच्या खासदारांकडून झालेल्या मागणी संदर्भात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा आधार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून साहित्य क्षेत्रातून अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. राज्य सरकारच्या स्तरावरही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी महाराष्ट्रातील खासदार केंद्र सरकारला गळ घालत आहे. त्यासाठी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे Sanjay Dhotre यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांच्याकडे या संदर्भात आग्रह धरला आहे.  
 
केंद्र सरकारचे अभिजात भाषेचे निकष

  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा- भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  •  भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे

आतापर्यंत सहा भाषांना मिळाला दर्जा
अभिजात भाषा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत सहा भाषांना अभिजात दर्जा दिला आहे. त्यात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया या भाषांचा समावेश आहे. मराठी भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा ही मागणी फार जुनी आहे.

म्हणून सुप्रिया सुळेंनी मानले अजितदादांचे आभार

पठारे समितीने केली शिफारस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली होती. या समितीने  सन २०१३ मध्ये त्यांचा अहवाल सादर केला आहे. त्यातही मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळविण्यासाठी कशी पात्र आहे याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

ग्रंथधनाचे पुरावे
मराठी भाषेतील ग्रंथधनाचे व ही भाषा पुरातन भारतीय भाषांपैकी एक असल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यात बाराव्या-तेराव्या शतकापासूनच्या ग्रंथ संपदेचा समावेश आहे. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार त्यासाठी घेतला जातो.

भाषा संवर्धनासाठी फायदे

  • महाराष्ट्रातील सर्व १२ हजारापेक्षा अधिक ग्रंथालयांना सशक्त करणे.
  • मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सर्वांना भरीव मदत करणे.
  • मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
  • भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
  •  प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.                  

Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com