मोदींचे देशवासीयांना पत्र ; नवे अभियान, नव्या संधी...

भारतीय नागरीक आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतात.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात 130 कोटी भारतीयांनी आपल्या एकजुटीने जगाला अचंबित केले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही आपण नवे उदाहरण स्थापित करू. भारतीय नागरीक आपल्या सामर्थ्याने आर्थिक क्षेत्रातही जगाला चकितच नव्हे तर प्रेरितही करू शकतात, असा दुर्दम्य विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

सलग दुसऱ्या वेळेस स्पष्ट आणि घवघवीत बहुमताने विजयी झालेल्या नरेंद्र मोदी सरकारला आज (ता. 30) एक वर्ष पूर्ण होत आहे. देशाता कोरना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक पत्र लिहून वर्षपूर्तीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्षभरातील घटनांवर त्यांनी भाष्य केले आहे. 
त्यांनी स्वतःला प्रधानसेवक असे संबोधित केले आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांहून अधिक काळ गरीब कष्टकरी, कष्टकरी, फुटपाथपर वस्तू विकणारे, मजुरी करणारे यासह देशवासीयांना अनेक संकट, यातना सोसाव्या लागल्या आहेत, याची कबुली नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच्या सर्जिकल स्ट्राइक आणि पाकिस्तानच्या सिमेमध्ये घुसून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांचा उल्लेख या संदेशात आहे. त्याचबरोबर जनधन, उज्वला, किसान सन्मान, असंघटित मजुरांच्या बँक खात्यांवर थेट पैसे जमा होणे, मोफत गॅस जोडणी, मोफत वीज जोडणी, शौचालये, शहरी व ग्रामीण गरिबांसाठी लाखो घरे, यासारख्या अनेक योजना/ मुद्द्यांचा उल्लेख या पत्रात आहे.

कोरोना महामारीचा पदर धरून येणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटात आपल्याला स्व-सामर्थ्यावर उभे राहावेच लागेल आणि ती काळाची गरज आहे, असे सांगताना मोदींनी म्हटले की आयातीवरील अवलंबित्व आपल्याला दिवसेंदिवस कमी करत जाणे अपरिहार्य आहे. यापुढच्या मंदीच्या काळात आपल्याला स्वतःच्याच आपल्या सामर्थ्यावर वाटचाल करावी लागेल आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग असून देशवासीयांनी नुकतेच आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे

स्थानिक उत्पादनांच्या बळावर जन्माला येणाऱ्या आत्मनिर्भर भारतात प्रत्येक देशवासियासाठी, शेतकरी,  कामगार, लघु उद्योजक, स्टार्ट अपशी जोडलेले युवा उद्योजक या सर्वांसाठी हे नवे अभियान नव्या संधी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले. आपल्या संदेशाच्या अखेरीस त्यांनी आरोग्यसंपन्न राहा, सुरक्षित राहा, जागृत राहा, जागरूकता ठेवा, असेही आवाहन देशवासीयांना केले आहे.

पत्रात विविध मुद्दांचा उल्लेख 

सरकारने गेल्या वर्षभरात घेतलेल्या कलम 370 आणि कलम 35 रद्द करणे, तीन तलाकबंदी, नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए, निवृत्त लष्करी जवानांसाठीचे एक पद एक निवृत्तीवेतन, एक देश एक कर - GST, शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या किमान हमी भावाच्या मागणीची पूर्तता, संरक्षण दल प्रमुख हे पद निर्माण करणे आधी मुद्द्यांना या पत्रात पंतप्रधानांनी स्पर्श केला आहे. त्याबरोबरच अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा आणि त्यानंतर देशात कायम राहिलेल्या सामाजिक सद्भावनेचाही सूचक उल्लेख त्यांनी केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com