नव्या सहकाऱ्यांना मोदींचा महत्वपूर्ण सल्ला 

बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.
 Modi's important advice to new colleagues .jpg
Modi's important advice to new colleagues .jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील नवीन सहकाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. यामध्ये प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका, असेही सांगितल्याची माहिती आहे. (Modi's important advice to new colleagues) 

बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा पहिल्यांदाच मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. कालच्या शपथविधीनंतर आज लगेचच मोदी २.० टीमने आपले काम सुरु केले आहे. नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्यासह गुरुवार (ता. ८ जुलै) देशातील वेगवेगळ्या आयआयटीच्या संचालकांशी चर्चा केली. 

जवळजवळ सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. मोदींनी या सर्वांना सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचे काम समजून घ्यावे, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मोदींनी मंत्रालयाचे कामकाज सुरु करावे, अशा सुचना नवीन सहकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका, असा सल्लाही दिल्याचे समजते. 

मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री घटक पक्षांचे आहेत. नवे मंत्रिमंडळात अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com