बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच मोदींनी केलं ट्विट ; म्हणाले…

बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे.
Joe Biden,Prime Minister Modi jpg
Joe Biden,Prime Minister Modi jpg

नवी दिल्ली : बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आहेत.  बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर जगभरातून त्यांच स्वागत करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.

बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले, भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे.

जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान म्हणालं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे.

अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मोदी यांनी बायडेन यांच्याबरोबर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे. “उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे.

भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासासाठी फायदेशीर आहे,” असं मोदी यांनी हॅरिस यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. 

अमेरिका "युनायटेड' - ज्यो बायडेन - कमला हॅरिस पर्वाला प्रारंभ

जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यु.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि 'अमेरिकेचा आत्मा' परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उपाध्यक्षपद स्वीकारत अमेरिकेच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात केली.

दोन आठवड्यांपूर्वीच हिंसाचाराचा साक्षीदार झालेल्या 'कॅपिटॉल'मध्येच बायडेन यांच्या शपथविधीमुळे शांततेच्या नव्या पर्वाची आशा अमेरिकी नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी दिमाखदार पद्धतीने झाला. हॅरिस या पहिल्या महाला उपाध्यक्ष झाल्या आहेत. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ अमेरिकी कॉंग्रेसच्याच सदस्यांना हजर राहण्याची परवानगी होती. दरवेळी उपस्थित राहणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व व्यासपीठासमोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या अमेरिकेच्या दोन लाख राष्ट्रध्वजांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com