MLAs reach Rajya Sabha polls wearing PPE kits! | Sarkarnama

पीपीई किट घालून आमदार पोचले राज्यसभेच्या मतदानाला ! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जून 2020

देशभरातील आठ राज्यांत राज्यसभेच्या 19 जागांसाठी शुक्रवारी (ता. 19) मतदान होत आहे. त्यात मध्य प्रदेशमधील तीन जागांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे कमलनाथ सरकार जाऊन लॉकडाउनपूर्वीच भाजपचे शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आलेले आहे. मताची फटाफूट होऊ नये, यासाठी कॉंग्रेसने मतदानासाठी सर्व आमदारांना बसमधून आणले होते. त्यात कोरोनाग्रस्त एक आमदार पीपीई किट घालून विधानसभेत पोचले होते. 

भोपाळ : देशभरातील आठ राज्यांत राज्यसभेच्या 19 जागांसाठी शुक्रवारी (ता. 19) मतदान होत आहे. त्यात मध्य प्रदेशमधील तीन जागांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे कमलनाथ सरकार जाऊन लॉकडाउनपूर्वीच भाजपचे शिवराजसिंह चौहान यांचे सरकार सत्तेवर आलेले आहे. मताची फटाफूट होऊ नये, यासाठी कॉंग्रेसने मतदानासाठी सर्व आमदारांना बसमधून आणले होते. त्यात कोरोनाग्रस्त एक आमदार पीपीई किट घालून विधानसभेत पोचले होते. 

मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार कुणाल चौधरी यांना नुकतीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान, राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. अगोदरच कॉंग्रेसच्या काही आमदारांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला धोका होऊ नये, या साठी चौधरी हे कोरोनाची लागण झालेली माहिती असूनही मतदान करण्यासाठी पीपीई कीट घालून विधानसभेत पोचले होते. 

चौधरी यांनी संपूर्ण अंगावर पांढऱ्या रंगाचे पीपीई कीट परिधान केले होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका सहकाऱ्यानेही पीपीई कीट घातले होते. मतदान केल्यानंतर चौधरी हे तातडीने तेथून निघून गेले. कोरोना विषाणूचा इतर लोकांना संसर्ग होऊ नये, या साठी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण विधानसभेचे  सॅनिटायझिंग केले आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळण्याची शक्‍यता आहे. तिसरी जागा कॉंग्रेसला मिळणे शक्‍य आहे. जिंकण्यासाठी मध्य प्रदेशात एका उमेदवाराला 52 मते मिळणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाकडे 107 आमदार असून त्यांना समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह, तर भाजपकडून नुकतेच पक्षात आलेले ज्योतिरादित्य शिंदे हे निवडणूक लढवित आहेत. 

पुणे जिल्ह्यातील या संस्थांमधील कारभाऱ्यांना मुदतवाढीचा बोनस 

पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी), जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), सात सहकारी साखर कारखाने आणि चार खरेदी-विक्री संघासह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 236 विविध सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकांना पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे या संस्थांवरील सध्याचे कारभारीच आणखी किमान तीन महिने आपापल्या पदावर कायम राहणार आहेत. 

राज्य सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी मार्चच्या अखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा मुदतवाढ दिली होती. ही पहिली मुदतवाढ येत्या 30 जून रोजी संपत आहे. मात्र या मुदतीतही या निवडणुका घेणे शक्‍य नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर या सर्व संस्थांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारकडून आज (ता. 18) करण्यात आलेली आहे. त्यानुसार या संस्थांवरील विद्यमान संचालक मंडळांना येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 

दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये सोमेश्वर (ता. बारामती) व छत्रपती (ता. इंदापूर), राजगड (ता. भोर), कर्मयोगी शंकरराव पाटील (ता. इंदापूर), घोडगंगा (ता. शिरूर), भीमा पाटस (ता. दौंड) आणि भीमाशंकर (ता. आंबेगाव) यांचा समावेश आहे. 

या शिवाय जिल्ह्यातील मावळ, आंबेगाव, पुरंदर आणि भोर या चार तालुक्‍यांच्या खरेदी-विक्री सहकारी संघांनाही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळालेली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख