आमदार पाटील यांचा धक्कादाय खुलासा; भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती  

पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
Shrimant Patil .jpg
Shrimant Patil .jpg

बेंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील (Shrimant Patil) यांनी रविवारी केला. मात्र, मी भाजपची पैसे न घेता पक्षात आलो. मला पैसे नको, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होते. मात्र, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आले नाही, असे पाटील यांनी सांगितले. (MLA Patil said he had offered money to join the BJP) 

मला दिलेली पैशांची ऑफर न घेता मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे पाटील म्हणाले. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते. त्यावेळी मला कितीही पैसे मागता आले असते. पण, मी पैशांची मागणी केली नाही. लोकांची सेवा करण्यासाठी मी मंत्रीपदाची मागणी केली होती, असेही पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, मला माहित नाही मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. मात्र, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलणे झाले आहे.

पाटील हे कर्नाटकातील कागवाड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते काँग्रेस आणि जनता दल-सेक्युलर (जेडीएस) मधून भाजपमध्ये सामील झालेल्या १६ आमदारांपैकी एक आहेत. या आमदारांनी पाठिंबा काढून घेत भाजपमध्ये प्रवेश केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते.

दरम्यान, राज्यात येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. उद्या (ता. १४ सप्टेंबर) कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पक्षांतर केलेले आमदार अधिवेशनात नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.  

 Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com