MLA Nitesh Rane letter to Amit Shah Protect Rohan Rai  | Sarkarnama

आमदार नितेश राणे यांचे अमित शहांना पत्र ;  रोहन रॅायला सुरक्षा द्या...

वृत्तसंस्था
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

रोहन रॉय याचा दिशा आणि सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबध आहे. रोहन रॅायला केंद्र सरकारने सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे अमित शहांकडे केली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय विविध अॅगलने करीत आहे. सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय भाजपचे नेते नारायण राणे यांनी नुकताच पत्रकार परिषदेते व्यक्त केला होता. आता आमदार नितेश राणे यांची गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. दिशा सालियन हिचा मित्र रोहन रॉय याचा दिशा आणि सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबध आहे. रोहन रॅायला केंद्र सरकारने सुरक्षा दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे अमित शहांकडे केली आहे.

दिशा सालियनसोबत रोहन रॉय हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी रोहन रॉय याची कुठलीही चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. दिशाचा इमारतींवरून मृत्यू झाला होता, त्यावेळी रोहन रॅाय हा त्या फ्लॅटमध्ये होता. ती इमारतींवरून खाली पडल्यानंतर रोहन 20 ते 25 मिनिटांनी खाली आला होता. या सगळा प्रकार संशय निर्माण करणारा आहे, असं नितेश राणे यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे, असं स्पष्ट मत आमदार नितेश राणे यांनी पत्रात व्यक्त केलं आहे. मुंबई सोडून जावं, यासाठी रोहन रॅाय याला कुणीतरी धमकी दिली असावी. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्यानं रोहन रॅाय याला मुंबईत येण्यास भीती वाटत असावी, त्याच्यावर कोणीतरी दबाब टाकत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी या पत्रात केला आहे.  
 
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला अटक केली आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी प्रत्येक तेथील प्रत्येक राजकीय पक्ष सुशांतचा मुद्दा उचलून धरत आहे. आता रियाच्या पाठिंब्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आली आहे. रिया ही बंगालची मुलगी असून, तिला न्याय मिळवून देणारच असा निर्धार काँग्रेसने केला आहे. 

बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुशांतचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. यातच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने बिहारची जबाबदारी सोपवल्याने सुशांतचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार हे स्पष्ट झाले आहे. बिहारमधील राजकीय पक्ष हे सुशांतला बिहारचा मुलगा असे म्हणून जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
 
रियाचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने ती सध्या भायखळा कारागृहात आहे. दरम्यान, रियाच्या जामिनासाठी कोणतीही घाई नसल्याचे विधान तिचे वकील सतिश मानेशिंदे यांनी केले आहे. 'एनसीबी'कडून रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची चौकशी झाली होती. ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या बॉलीवूडमधील काही कलाकारांची नावे या दोघांनी उघड केली आहेत. बॉलीवूडमधील पार्ट्या आणि ड्रग्जची तस्करी यावरही या दोघांनी प्रकाश पाडला आहे. एनसीबीकडून काही कलाकारांना या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रियावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. रिया ही ड्रग्ज रॅकेटची सक्रिय सदस्य असून, तिने अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि ती यातील आर्थिक व्यवहारांमध्येही सहभागी होता, असे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख