मोदी-शहांचा पुन्हा धक्का; बड्या नेत्यांना मागे टाकत भूपेंद्र पटेल नवे मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये चार ते पाच नावांची चर्चा होती.
Bhupendra Patel
Bhupendra Patel

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. रुपानी यांचा वारसदार कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अनेकांच्या नावांवर चर्चा सुरू होती. पण अचानक भूपेंद्र पटेल यांचं नाव समोर आलं अन् त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. (MLA Bhupendra Patel elected as the new Gujrat CM)

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन शनिवारी राजीनामा सोपवला. 

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये चार ते पाच नावांची चर्चा होती. पण त्यांना मागे टाकत घाटलोदिया मतदारसंघातील आमदार भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 2017 मध्ये एक लाखांहून अधिक मतं मिळवत ते विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते निकटवर्तीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पटेल यांचे नाव पुढे करत पुन्हा एकदा धक्का दिला आहे. 

ही नावं होती मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये...

1) नितीन पटेल 
नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री आहेत. ते पहिल्यांदा विधानसभेवर 1990 मध्ये निवडून गेले. सध्याच्या सरकारमधील ते सर्वांत जुनेजाणते नेते आहेत. ते पहिल्यांदा 1995 मध्ये मंत्री झाले. आरोग्य, कुटुंब कल्याण, कृषी, जलसंपदा, रस्ते, अर्थ व महसूल यासारख्या महत्वाच्या खात्यांची धुरा त्यांनी सांभाळली आहे.  

2) मनसुख मांडवीय 
मांडवीय गुजरातमधील भावनगरचे आहेत. ते राज्यातून राज्यसभेवर गेले आहेत. मांडवीय हे काही वेळापूर्वी रूपानी यांच्या निवासस्थानीही दाखल झाले आहेत. मांडवीय यांना नुकतीच केंद्रात राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्यावर अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

3) आर.सी.फाल्डू 
आर.सी.फाल्डू हे जामनगर दक्षिणचे आमदार आहेत. त्यांनी कृषी, मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि परिवहन या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. 

4) चंद्रकांत पाटील 
चंद्रकांत पाटील हे सुरतचे खासदार आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सुरत शहराच्या विकासात त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. शहरातील वस्त्रोद्योग आणि हिरे उद्योगाच्या विकासासाठी त्यांनी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com