उत्तराखंड दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू; अद्याप 150 जण बेपत्ता

बोगद्यांमध्ये अद्याप 150 जण बेपत्ता असून 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्वत्र गाळ पसरल्याने बवाचकार्यात अडथळे येत आहेत.
Missing 150 persons in glacier burst in uttarakhand says local police
Missing 150 persons in glacier burst in uttarakhand says local police

डेहराडून : हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तपोवन परिसरातील बोगद्यांमध्ये आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. बोगद्यांमध्ये अद्याप 150 जण बेपत्ता असून 15 जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्वत्र गाळ पसरल्याने बवाचकार्यात अडथळे येत आहेत.

उत्तराखंड राज्यात चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे. तपोवन धरणालगत सुरू असलेल्या कामावरील सुमारे 170 मजूर वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. त्यापैकी 15 जणांना वाचविण्यात आले आहे. 

दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, सीडीआरएफ, आयटीबीपी च्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. हिमकडा कोसळल्यानंतर त्यासोबत मोठ्या प्रमाणावर दगड-माती वाहून आली. परिणामी, तपोवन परिसरातील बोगड्यांमध्ये गाळाचे साम्राज्य पसरले आहे. यामध्येच मजूर अडकल्याची भिती आहे.

दोन्ही बोगद्यातील गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रविवारी तपोवन परिसरातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या कामाच्या ठिकाणाहून 9 ते 10 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी आणखी मृतदेह सापडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

हिमकडा का कोसळतो?

हिमकडा कोसळण्याची अनेक कारणे सांगता येतील. त्यामध्ये धूप, पाण्याचा दाब वाढत जाणे, हिमस्खलन, भूकंप याचा समावेश असतो. हिमकडा कोसळताना त्यातील पाणी सखल भागाकडे झेपावते. कोट्यवधी लिटर पाणी एकाचवेळी झेपावल्याने महापूराची स्थिती निर्माण होते. हिमकड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते. त्यानुसार त्याची तीव्रता ठरते. काही वेळा पुर्ण हिमकडा कोसळत नाही. थोडा-थोडा भाग निसटत जातो. त्यानुसार पाणीहीही कमी-अधिक प्रमाणार बाहेर पडते. काही मिनिटे, काही तास, काही दिवस पाणी वाहत राहेत. 

Edited By Rajanand More


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com