मेहुल चोकसीचे प्रत्यार्पण भारताकडे शक्य..पंतप्रधान ब्राउने म्हणाले.."प्रायव्हेट जेट पाठवा.. "

मेहुल चोकसी बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता.
Sarkarnama Banner - 2021-05-27T125429.605.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-27T125429.605.jpg

नवी दिल्ली  : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी व  हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोकसी  mehul choksi याला डॅामिनिका देशात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत इंटरपोलने सीबीआयला कळविलं आहे.  "मेहुल चोकसीला आमच्याकडे पाठवू नका, त्याला थेट भारतात पाठवा," असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी डॅामिनिकाच्या प्रशासनाला सांगितले आहे. mehul choksi arrested in dominica was destroying documents on a beach en route cuba

गॅस्टॅान ब्राऊन म्हणाले, "मेहुलला ४८ तासात भारतात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी भारताने प्रायव्हेट जेट पाठविण्याची व्यवस्था करावी, त्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला कुठलीही अडचण येणार नाही." एँटिगुआ येथून अचानक गायब झालेला फरार भारतीय उद्योजक मेहुल चोकसी शेजारच्या डॅमिनिकामध्ये सापडला आहे.  त्याला डॅमिनिकच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले. मेहुल चोकसी हा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आहे, त्याविरुद्ध इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

डॅामिनिकामध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्या मेहुल चोकसीवर कारवाई करुन त्याला आमच्याकडे न पाठवा थेट भारताकडे सोपवा, असे ब्राऊन यांनी डॅामिनिका प्रशासनाला सांगितले आहे. सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. कॅरेबियन समुद्रातील डॅामिनिका हा छोटासा देश आहे.

तीन दिवसापासून मेहुल चोकसी हा बेपत्ता होता. याबाबत चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी.'एनआयआय' माहिती दिली होती.  विजय अग्रवाल म्हणाले की मेहुल चोकशी बेपत्ता झाल्याने त्यांचा परिवार चिंतेत आहे. मला याबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. एंटीगुआचे पोलिस मेहुल चोकसी यांचा शोध घेत होते. त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांचे कुंटुबिय चिंतेत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले होते.  

एंटीगुआ च्या प्रसारमाध्यमानुसार,  antiguanewsroom.com पोलिसांनी मेहुल चोकशी यांचा तपास सुरु केला होता. चोकशी हा आयलॅंडच्या दक्षिण परिसरात एका हॅाटेलमध्ये जेवण करण्यासाठी रात्री उशीरा गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. इंटरपोलने चोकसीसाठी यल्लो नोटीस बजावली होती. 

डॅामिनिकन देशाला आम्ही कळविले होते की मेहुल चोकसीला तुमच्या देशात बेकायदा प्रवेश देऊ नका. पण चोकसी त्या ठिकाणी पोहचण्यात यशस्वी ठरला.त्याला अटक करण्यात आली आहे, असे एंटीगुआ आणि बारबुडाचे पंतप्रधान गॅस्टॅान ब्राऊन यांनी सांगितले.  

Edited by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com