महापौराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या 

या घटनेनंतर शरहात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 Shivraj Paswan .jpg
Shivraj Paswan .jpg

पाटणा : बिहारमधील (Bihar) कटीहार येथे महापौरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने कटीहारसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवराज पासवान (Shivraj Paswan) असे मृत्यू झालेल्या महापौराचे नाव आहे. ते राहत असलेल्या संतोष कॅालनी परिसरातच ही घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर थेट गोळीबार सुरु केला. (Mayor shot dead at Katihar in Bihar) 

त्यामध्ये पासवान यांना ३ गोळ्या छातीवर लागल्या आहेत. या घटनेनंतर शरहात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीसरात मोठी दहशत पसरली आहे. पासवान यांना तात्काळ केएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पासवान हे मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्याचवेळी, काही अज्ञात युवकांनी समोर येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले. अद्यापही आरोपी फरार असुन पोलिस कसून शोध घेत आहेत. 

महापौर पासवान यांना गोळी लागल्याचे समजताच मोठ्या संख्येने नागरिक हुजूम रुग्णाल्यात पोहोचले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी आणि पासवान यांच्या समर्थकांनी केली आहे. येथे जमलेल्या गर्दीची समजूत काढत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. त्याच बरोबर आरोपींना तात्काळ पकडण्याचे आश्वासन दिले. 

दरम्यान, लोजपाचे नेते चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी शिवराज पासवान यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर २६ मार्च २०२१ रोजी त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. राजकीय वादातून त्यांची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com