गेहलोतांना मायावती सुप्रीम कोर्टात धडा शिकविणार...

मायावती यांच्या बहुजन पक्षाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये गेले आहे. आता याच मुद्यावरून मायावती या न्यायालयाची पायरी चढणार असल्याचे समजते.
Mayawati.jpg
Mayawati.jpg

नवी दिल्ली :  राजस्थानमधील राजकीय नाट्य कुठल्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचं ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती गेहलोत सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणार आहे.मायावती यांच्या बहुजन पक्षाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये गेले आहे.  आता याच मुद्यावरून मायावती या न्यायालयाची पायरी चढणार असल्याचे समजते.  


गेहलोत यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांनी गेहलोत यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. गेहलोत सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये या सहा आमदारांना आपल्या पक्षात घेतले होते.  सोनिया गांधी यांच्याशी त्यांची भेट घालून त्यांना काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य केले होते. यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाला होता, असा आरोप मायावतींनी त्यावेळी केला होता. याबाबत गेहलोत सरकारने राजीनाम्याची मागणीही त्यांनी  केली होती. त्यावेळी मायावती यांनी निवडणुक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. पण आयोगाने ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता.   

राजस्थान निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे 99 तर बसपाचे 6 आमदार निवडून आले होते. अशोक गेहलोत यांनी अपक्ष आणि अन्य लहान पक्षाच्या मदतीने बहुमत सिद्ध करण्यासाठी 101 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा घेण्यात यशस्वी झाले होते. पण नंतर त्यांनी या सहा आमदारांना काँग्रेसमध्ये सामील करून घेतले. त्यामुळे त्यांच्याकडील आमदारांची संख्या 105 इतकी झाली होती. 
 
राजस्थानच्या राजकीय घडामोडी नाट्यात आता बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती या एंट्री घेणार आहेत. यामुळे राजस्थानमधील राजकीय नाट्य कुठल्या वळणावर जाणार हे पाहणे महत्वाचं ठऱणार आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर अशोक गेहलोत यांच्या समोर सरकार टिकविण्याचे आवाहन आहे. भाजप सर्व परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. यातच 'बहनजी' मायावतीमुळे गेहलोत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  मायावतीमुळे गेहलोत सरकार पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

याबाबत मायावती म्हणाल्या, ''राजस्थानमध्ये निवडणुकानंतर काँग्रेसला पाठिंबा दे्ण्यासाठी कुठल्याही अटीविना बसपा तयार होता. पण अशोक गेहलोत यांनी बहुजन पक्षाला धोका देऊन बसचे सहा आमदार फोडले.'' या सहा आमदारांबाबत मायावती म्हणाल्या, ''हे बसपाचे सहा आमदारांचा काँग्रेसमधील प्रवेश कायद्याच्या विरोधात आहे. याबाबत बसपा यापूर्वी न्यायालयात गेली आहे. गेहलोत सरकार आणि काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी याच वेळेची आम्ही वाट पाहत होतो. आता आम्ही याबाबत सुप्रीम कोर्टपर्यंत जाणार आहोत.''
 
 Edited  by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com