मायावती म्हणतात, "" सत्ता आल्यास परशुरामासह प्रत्येक जातीधर्मातील संताच्या नावे रुग्णालये उभारणार !''

यूपीच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी शेकडो पुतळ्याची उभारणी केली होती. त्यामुळे त्या देशभर चर्चेत राहिल्या होत्या.
मायावती म्हणतात, "" सत्ता आल्यास परशुरामासह प्रत्येक जातीधर्मातील संताच्या नावे रुग्णालये उभारणार !''

लखनौ : "" उत्तरप्रदेशाच जर बसपचे पुन्हा सरकार आले तर सर्व जातीधर्मातील संतांच्या नावाने रुग्णालयाने उभारण्यात येतील अशी महत्त्वाची घोषणा यूपीच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज केली आहे. 

यूपीच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी शेकडो पुतळ्याची उभारणी केली होती. त्यामुळे त्या देशभर चर्चेत राहिल्या होत्या. ज्यावेळी त्यांचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी सर्वजातीपातींची मोट बांधण्यात यश मिळविले होते. अगदी यूपीतील ब्राह्मण समाजही त्यांच्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला होता. 

मायावती या प्रारंभी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री बनल्या होत्या. मात्र भाजपला मुख्यमंत्री देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी घुमजाव केला होता. पुढे राज्यात मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भाजपचे सरकार बहुमतांने सत्तेवर आले आहे. आज योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे. बदलत्या राजकारणाकडे पाहिले तर योगी हे शक्तीशाली मुख्यमंत्री म्हणून ओळखले जावू लागलेत. आज अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्‍नही मार्गी लागला आहे. अर्थात भाजपला त्याचे सर्व श्रेय जाते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही अयोध्येत नुकताच पार पडला. सत्ताधारी भाजपच्या विरोधात कॉंग्रेसच्या प्रियंका गांधी, मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे रान उठवित असतात. मात्र या तिघांमध्येही एकी नाही. मायावती तर कॉंग्रेसला पाण्यात पाहात असतात. तर अखिलेश यादव हे स्वबळावर राज्यात सत्ता आणण्याचे स्वप्न पाहत असतात. 

मायावती या तर नेहमीच चर्चेत असतात. त्या भाजप सरकारलाही लक्ष्य करतात. आज त्यांनी ट्‌विट करून ब्राह्मण समाजाचे आदर्शस्थान असलेल्या परशुरामासह सर्व जातीधर्मातील संतांच्या नावाने राज्यात रुग्णालये उभी करण्यात येतील असे जाहीर केले आहे. याचाच अर्थ मायावती या सर्व जातीपातींना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सुरू आहे. 

चार वेळा मुख्यमंत्री बनलेल्या मायावतींनी आपल्या राजवटीत प्रत्येक जातींच्या प्रसिद्ध संताच्या नावाने अनेक योजना सुरू केल्या होत्या. तसेच काही जिल्ह्यांना संतांची आणि समाजसुधारकांची नावेही दिली आहेत. त्यानंतर सत्तेवर आलेल्या समाजवादी पक्षाने मायावतींचे अनेक निर्णय रद्द केले होते. 

कोरोनोचे संकट हाताळण्यात यूपीतील योगी आदित्यनाथ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीकाही मायावतींनी केली आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की प्रत्येक जातीचे जे आदर्श संत आहेत त्यांच्या नावाने यूपीत महत्त्वाच्या ठिकाणी रुग्णालये उभारण्यात येतील. अशा रुग्णालयातून लोकांना सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील. ब्राह्मण समाजाचे आदर्शस्थान परशुरामाचाही त्यामध्ये समावेश असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com