मायावती म्हणाल्या 'ते' वृत्त तथ्यहीन, अफवा पसरवणारे...

त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे.
 Mayawati .jpg
Mayawati .jpg

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीसाठी आता पासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये विधानसभा निवडणुकींबाबत, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा (BSP) व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहे. यामध्ये काहीच तथ्य नाही. असे त्यांनी जाहिर केले आहे. (Mayawati said dhis news was wrong)

या संदर्भात बसपा प्रमुख मायावती यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, ''एक वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. त्या वृत्तामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.'' असे त्या म्हणाल्या आहेत. 

तसेच, ''या संदर्भात पार्टीकडून असे स्पष्ट केले जाते की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार, असत्याचे त्यांनी सांगितले आहे. 

संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बसपाने, आता राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुका २०२२ मध्ये होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या आधी एक ट्वीट करत मायावती यांनी पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी, ही एक नवी राजकीय व सामाजिक सुरूवात आहे. जे की नक्कीच इथे राज्यात जनतेचा बहुप्रतीक्षित विकास, प्रगती व आनंदाच्या नव्या युगाची सुरूवात करेल. या ऐतिहासिक पावलासाठी लोकांचे हार्दिक अभिनिंदन व शुभेच्छा. असे त्यांनी सांगत आकाली दल व बसपाच्या एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com