उत्तराखंडमधील दुर्घटना कशी घडली? नेमकं कारण काय...

उत्तराखंडने 2013 मध्येही महाभयंकर आपत्तीला तोंड दिले आहे. पण यावेळी तुलनेने त्याची तीव्रता कमी आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
Massive glacial burst in Uttarakhand led to massive flooding
Massive glacial burst in Uttarakhand led to massive flooding

डेहराडून : हिमकडा कोसळून नद्यांना आलेल्या महापूराने उत्तराखंड राज्यासमोर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे. उत्तराखंडने 2013 मध्येही महाभयंकर आपत्तीला तोंड दिले आहे. पण यावेळी तुलनेने त्याची तीव्रता कमी आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. नद्यांना काही क्षणात आलेले रौद्ररूप धडकी भरवणारे आहे. 

अलकनंदा आणि धौलीगंगा नद्यांना अचानक महापूर आला असून या दुर्घटनेत 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या नद्यांच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना हलविले जात असून उत्तर प्रदेशमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे. हिमकडा कोसळल्याने नद्यांना अचानक पूर आल्याची माहिती आहे.

हिमकडा म्हणजे बर्फाने आछ्यादित केलेला डोंगर असे म्हणता येईल. बर्फवृष्टी होत असलेल्या भागामध्ये असा हिमकडा पाहायला मिळतो. वर्षानुर्षे बर्फाचे थर साठत जाऊन हा हिमकडा तयार होतो. त्यामध्ये कोट्यवधी लिटर पाणी असते. आज घडलेल्या घटनेमध्ये हा हिमकडा कोसळल्याने नद्यांना पूर आला.

हिमकडा का कोसळतो?

हिमकडा कोसळण्याची अनेक कारणे सांगता येतील. त्यामध्ये धूप, पाण्याचा दाब वाढत जाणे, हिमस्खलन, भूकंप याचा समावेश असतो. हिमकडा कोसळताना त्यातील पाणी सखल भागाकडे झेपावते. कोट्यवधी लिटर पाणी एकाचवेळी झेपावल्याने महापूराची स्थिती निर्माण होते. हिमकड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते. त्यानुसार त्याची तीव्रता ठरते. काही वेळा पुर्ण हिमकडा कोसळत नाही. थोडा-थोडा भाग निसटत जातो. त्यानुसार पाणीहीही कमी-अधिक प्रमाणार बाहेर पडते. काही मिनिटे, काही तास, काही दिवस पाणी वाहत राहेत. 

आज काय घडले?

चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावांत आज हिमकडा कोसळला. त्यामुळे परिसरात महापूर आला आहे. अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे. प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या कामगार या पूरात वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, सीडीआरएफ, आयटीबीपी च्या टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत.

नदी किनारी असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. या गावांमध्ये मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे उत्तराखंडातील देवप्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेश या बागाला मोठ्या प्रमामावर नुकसान होण्याची भिती आहे. बद्रीनाथ व तपोपनच्या परिसरात ही घटना घडली आहे. दोन पूर वाहून गेल्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी स्पष्ट केले आहे. 

संपूर्ण देश उत्तराखंडसोबत : पंतप्रधान मोदी

उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेवर सातत्याने लक्ष असून संपूर्ण भारत उत्तराखंड सोबत आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी देश प्रार्थना करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून एनडीआरएफच्या बचाव कार्याची माहिती घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री अमत शहा यांनीही उत्तराखंडला सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचे सांगितले. 

महापूर ओसरतोय - त्रिवेंद्र सिंग रावत

नंदप्रयागच्या पुढे अलकनंदा नदीला आलेला पूर आता ओसरत असल्याची माहिती उत्तराखंचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी दिली. नदीच्या पाण्याची पातळी सामान्य पातळीच्या तुलनेत 1 मीटरने अधिक असली तरी ही पातळी कमी होत आहे. राज्याच्या मुख्य सचिव, आप्तकालीन विभागाचे सचिव, पोलिस अधिकारी नियंत्रण कक्षामध्ये परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com