जम्मू-काश्‍मीरच्या उपराज्यपालपदी मनोज सिन्हा; मुर्मू यांना केंद्रात नवी जबाबदारी? 

माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची गुरुवारी (ता. 6 ऑगस्ट) जम्मू-काश्‍मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त झालेले ते पहिले राजकारणी आहेत. सिन्हा माजी आयएएस अधिकारी गिरीशचंद्र मुर्मूची जागा घेतील.
Manoj Sinha as Lieutenant Governor of Jammu and Kashmir
Manoj Sinha as Lieutenant Governor of Jammu and Kashmir

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ नेते मनोज सिन्हा यांची गुरुवारी (ता. 6 ऑगस्ट) जम्मू-काश्‍मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. या केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त झालेले ते पहिले राजकारणी आहेत. सिन्हा माजी आयएएस अधिकारी गिरीशचंद्र मुर्मूची जागा घेतील. 

राष्ट्रपती सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गिरीशचंद्र मुर्मू यांचा जम्मू-काश्‍मीरच्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रपतींचे मीडिया सचिव अजय कुमार यांनी सांगितले की राष्ट्रपतींनी मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्‍मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. 

मनोज सिन्हा यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक आणि एमटेक केले आहे. ते "बीएचयू'च्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही होते. त्यांची राजकीय कारकीर्द 1982 मध्ये काशी हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाल्यापासून सुरू झाली. त्यांनी 1996 मध्ये प्रथमच लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळविला. सिन्हा हे 1989 ते 1996 या काळात भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य होते. 

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला. भाजपची सत्ता आल्याने मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रेल्वे राज्यमंत्रिपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्याकडे दूरसंचार मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देखील सोपविण्यात आला होता. मनोज सिन्हा हे भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. पूर्वी ते गाझीपूरचे खासदार होते आणि पूर्व उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचा एक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. 

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम 370 मधील बहुतेक तरतूदी रद्द करण्यात आल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. त्याच वेळी मुर्मू यांनी उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. 

गुजरात केडरचे माजी आयएएस अधिकारी असलेले मुर्मू यांनी गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला होता. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुर्मू त्यांचे मुख्य सचिव होते. मुर्मू यांच्या राजीनाम्याचे अधिकृत कारण अद्याप पुढे आलेले नाही. मात्र, उच्च पदावरील एका सूत्राने सांगितले आहे की, केंद्रात मुर्मू यांच्याकडे नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com