'मिशन 2024'साठी भाजपची मोठी खेळी...लोकसभेत 1 हजार खासदार? 

नवीन संसदेचे चेंबर १००० जण बसू शकतील अशा पद्धतीने बांधले जात आहे.
 Manish Tiwari .jpg
Manish Tiwari .jpg

नवी दिल्ली : लोकसभेत खासदारांचे संख्याबळ वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला आहे. २०२४ च्या आधी लोकसभेचे संख्याबळ वाढवत १००० किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा उल्लेख या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने केल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. मात्र, असा कोणताही निर्णय घेण्याआधी लोकांचे मत जाणून घेणे गरजेचे असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे. (Manish Tiwari criticizes the central government) 

मनिष तिवारी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ''संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी लोकसभेचे संख्याबळ १००० किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसदेचे चेंबर १००० जण बसू शकतील अशा पद्धतीने बांधले जात आहे. पण हे करण्याआधी लोकांसोबत गंभीरपणे यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

दरम्यान, केंद्र सरकार अतिशय वेगाने भव्यदिव्य नवीन संसद भवन 'सेंट्रल व्हिस्टा'चे (central vista) बांधकाम  करीत आहे. या प्रकल्पान्वये मुख्य संसद भवनाच्या वास्तूबरोबरच पंतप्रधानांचे निवासस्थान आणि मंत्रालयांच्या अन्य इमारतीही नव्याने उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे भूमिपूजन मागील वर्षी 10 डिसेंबरला झाले होते. हा तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आहे. मोदींचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे. 

नवीन संसद भवनामध्ये ८८८ लोकसभेचे सदस्य आणि ३८४ राज्यसभेच्या सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे येत्या २०२४ च्या लोकसभेमध्ये भाजप लोकसभेतील खासदारांची संख्या वाढवण्याची शक्यता तिवारी यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. सरकारने आधी इतर पायाभूत सुविधा सुधाराव्यात, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. याचबरोबर देशातील कोरोनाचे संकट आणि अर्थव्यवस्थेची पाहता सरकारने हा प्रकल्प गुंडाळावा, अशी भूमिकाही विरोधी पक्षांनी घेतली आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com