धक्कादायक : ममतांच्या खासदार भाच्याला थोबाडीत मारणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू - Man who slapped Abhishek Banerjee dies mysteriously in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

धक्कादायक : ममतांच्या खासदार भाच्याला थोबाडीत मारणाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जून 2021

देवाशिष आचार्य असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मागील वर्षीपासून भाजपशी जोडले गेले होते.

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना थोबाडीत मारणाऱ्याचा गुरूवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांना काही अनोळखी व्यक्तींनी रुग्णालयात सोडले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा लगेच मृत्यू झाल्याने बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. हा खून असल्याचा आरोप कुटूंबियांनी केला आहे. (Man who slapped Abhishek Banerjee dies mysteriously in west bengal)

देवाशिष आचार्य असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मागील वर्षीपासून भाजपशी जोडले गेले होते. आचार्य  यांना मिदनापूर येथील तमलुक जिल्हा रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले होते. पहाटे 4.10 वाजता काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना आणून सोडल्याचे रुग्णालयातील नोंदींवरून दिसून आले आहे. त्यानंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कुटूंबीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी हा खून असल्याचा दावा केला.

हेही वाचा : नारायण दाभाडकर यांनी बेड दिला की नाही; माहिती अधिकारातून उलगडा

देवाशिष यांनी अभिषेक बॅनर्जी यांना 2015 मध्ये थोबाडीत मारली होती. व्यासपीठावर येत आचार्य यांनी ही कृती केल्याने बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण कऱण्यात आली होती. या प्रकारानंतर पोलिसांनी आचार्य यांना अटक केली होती. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण देवाशिष हे मानसिक रुग्ण असल्याचे सांगितल्यानंतर बॅनर्जी यांनी विनंती केल्याने पोलिसांनी त्यांना सोडून दिले होते. बॅनर्जी यांच्या या निर्णयावर तृणमुलच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

देवाशिष यांच्या मृत्यूनंतर भाजपने आता चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात देवाशिष हे 16 जून रोजी सायंकाळी दोन मित्रांसोबत घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते एका चहाच्या टपरीवर थांबले. देवाशिष यांना एक फोन आल्यानंतर ते तिथून मित्रांना सोडून निघून गेले. त्यानंतर काय घडले, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. 

दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून भाजप व तृणमूल काँग्रेस आमनेसामने आहे. भाजपकडून तृणमूलला लक्ष्य करण्यात आले असून राज्यपाल जगदीप धनखर यांच्याकडून सरकारवर टीका केली जात आहे. दोन दिवसांपासून ते दिल्लीत असून बंगालच्या स्थितीबाबत राष्ट्रपती व गृहमंत्र्यांना भेटणार असल्याची चर्चा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख