ओवैसींना झटका; बंगालच्या प्रभारीनेच दिला ममतांना पाठिंबा

बंगालमध्ये निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असतानाच ओवैसींना झटका बसला आहे.
 Asaduddin Owaisi. jpg
Asaduddin Owaisi. jpg

नवी दिल्ली : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या एआयएमआयएमने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमचा ममतांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणुकीआधीच ओवैसींना झटका बसला आहे. एमआयएमचे पश्चिम बंगाल प्रभारी झमीरुल हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिला. 

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आश्चर्याचा धक्का दिला होता. महत्त्वाचे म्हणजे या निकालामुळे उत्साह वाढलेल्या ओवैसी यांनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आता बंगालमध्ये निवडणुकीचे राजकीय वातावरण तापत असतानाच ओवैसींना झटका बसला आहे.

एमआयएमचे पश्चिम बंगाल प्रभारी जमीरूल हसन यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. हसन हे इंडियन नॅशनल लीग या पक्षाची स्थापना करणार असून, त्यांनी पक्षाचा तृणमूल काँग्रेसला पाठिंबा असेल, असे म्हटले आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, इथे इंडियन नॅशनल लीग त्यांना पाठिंबा देणार आहे. 

जानेवारीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी शरीफ जाकर पीरजादा अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे हसन नाराज झाले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 

'मी २०१५ मध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला होता. हा पक्ष बंगालमधील २० जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही कष्ट केले. याचा पुरावा म्हणजे देशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला लक्ष्य केले नाही, मात्र ममता बॅनर्जी केले. आमच्या अनेक लोकांना अटक करण्यात आले. मलाही अटक करण्यात आले होते. मात्र, ओवैसी जुन्या लोकांना किंमत देत नाहीत. त्यांनी एकदाही अटक केलेल्या लोकांबद्दल भूमिका मांडली नाही', अस हसन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com