ममतांची मुख्यमंत्रिपदाची तिसरी शपथ अन् राज्यपालांविरोधातील वादाची पुन्हा ठिणगी!

विधानसभा निवडणुकीत तृणमूल कांग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.
 Mamata Banerjee .jpg
Mamata Banerjee .jpg

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी शपत घेतली त्याच वेळी राज्यापाल आणि त्यांच्यातील वादाची पुन्हा ठिणगी पडली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झाला. (Mamata Banerjee was sworn in as the Chief Minister)

या शपथविधी सोहळ्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अपला सर्वप्रथम लढा कोरोनाविरुद्धचा असेल. त्याच बरोबर त्यांनी बंगालमधील हिंसाचाराच्या पार्शवभूमिवर लोकांना शांतता राखण्याचेही आवाहन केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या शपथविधीनंतर राज्यपाल धनखार यांनी ममता यांचे अभिनंदन केले. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की ''निवडणूक निकालानंतर उसळेला भयंकर हिंसाचार संपवणे हीच आपली प्राथमिकता आहे. मला पूर्ण खात्री आहे की, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तत्काळ पावले उचलतील. या परिस्थितीत माझी छोटी बहीण कारवाई करेल, अशी मला आशा आहे. सरकार संविधान व कायद्यानुसार काम करून संघराज्य पद्धतीचा सन्मान करेल,'' असे धनखार म्हणाले. 

राज्यपालांच्या भूमिकेवर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले. त्यांनी राज्यपालांच्या हातातील माईक घेत संवाद साधला. त्या म्हणाल्या, ''मी आज शपथ घेतली आहे. तीन महिन्यांपासून राज्य निवडणूक आयोगाच्या हाती होते. आयोगाने या काळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नियुक्त्याही केल्या. या परिस्थितीत आपण कामाला सुरुवात करत आहोत.'' 

दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लवकरात लवकर हा हिंसाचार थांबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीका केली. नड्डा म्हणाले,  ''ते शपथ घेऊ शकतात. प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. पण आम्हीही ही शपथ घेतो की आम्ही बंगालमधल्या राजकीय हिंसाचाराचा नायनाट करु''.  

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) २१३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ७७ जागा मिळाल्या, इतर पक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. बंगालमध्ये भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्यात सरळ लढत झाली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com