ममतांनी मोदींना पाठविले आंबे ; BJP आणि TMC यांच्यात गोडवा निर्माण होणार का? - mamata banerjee sends mangoes to pm Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

ममतांनी मोदींना पाठविले आंबे ; BJP आणि TMC यांच्यात गोडवा निर्माण होणार का?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात अनेक विषयावरुन वाद आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संबध तणावपूर्ण झाले असले तरी मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे पाठविले आहेत. यामुळे ममतादीदी आणि मोदी यांच्यातील कडूता संपणार का, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. mamata banerjee sends mangoes to pm Narendra Modi

विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात अनेक विषयावरुन वाद झाले. त्यावरुन राजकारण तापलं. अजूनही त्यांच्यातील विस्तव गेलेला नाही. अशा परिस्थिती ममतादीदींनी मोदींना आंबे पाठविल्याने त्यांच्यात गोडवा निर्माण होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींना हिमसागर, मालदा, लक्ष्मणभोग जातीचे आंबे भेट म्हणून पाठविले आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ममता बॅनजी यांनी आंबे पाठविले आहे.  २०११ पासून त्या दिल्लीत राजकीय नेत्यांना आंबे पाठवित आहे. मोदींना त्यांनी मिठाई देखील पाठविली होती. याचा उल्लेख अभिनेता अक्षय कुमार याने  घेतलेल्या मुलाखतीत मोदींनी केला होता. आपल्याला बंगालची मिठाई खूप आठवते अन् ममतादीदी त्यांना मिठाई पाठवित असतात, असे मोदी म्हणाले होते.

पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या अनेक विषयांवर वाद सुरू आहेत, अशा परिस्थितीत हे आंबे राज्य आणि केंद्र यांच्यातील कडुता दूर करुन त्यांच्यात गोडवा निर्माण करेल का, हे आता येणारा काळच ठरवेल. 

राज्यपालांनी राजकीय उद्देशाने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र : नवाब मलिक
मुंबई : ''ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही,'' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपाल कोश्यारींच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख