ममतांची भिस्त भवानीपूरवर; मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शेवटची संधी

केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.
Mamata Banerjee to contest from Bhabanipur in the Assembly bypolls
Mamata Banerjee to contest from Bhabanipur in the Assembly bypolls

कोलकाता : पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगला भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रीपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. ममतांना आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ही निवडणूक अखेरची संधी असणार आहे. या निवडणुकीत त्या पराभूत झाल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. (Mamata Banerjee to contest from Bhabanipur in the Assembly bypolls)

केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समसेरगंज आणि जंगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी मतदान होईल. तर तीन ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सोमवारी (ता. 6) या निवडणुकीची अधिसुचना जारी होण्याची शक्यता आहे. इच्छूकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानं ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक लढवून विजयी होणं आवश्यक आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता. 

ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तिथून त्यांना विजयी होण्यात फारशी अडचण येणार नाही, असा दावा तृणमूलकडून केला जात आहे. आता भाजपसह इतर काँग्रेस व डाव्या पक्षांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस व डाव्यांकडून उमेदवार उभा न करण्याबाबत एकमत होऊ शकते, असीशी चिन्हं आहेत. 

भाजपकडून ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहे. नंदीग्राममध्ये ममता यांनी आपला सहज विजय होईल, असा दावा केला होता. पण त्यांचा पराभव झाला. निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारावरून भाजपनं त्यांच्याविरोधात रान उठवलं आहे. त्यामुळे हा मुद्दाही पोटनिवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे. ममतांचे भाचे व खासदार अभिषेक बॅनर्जी व त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. नारद घोटाळ्यात काही मंत्र्यांविरोधात आरोपपत्र दाखल कऱण्यात आले आहे, असे अनेक मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जाऊ शकतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com