भाजप सत्तेवर आल्यास बंगाली नागरिकांना 'चले जाव'...

बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास बंगाली नागरिकांना भाजपकडून पश्चिम बंगालमधून हाकलून लावण्यात येईल, असे धक्कादायक वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले. नंदिग्राम येथील एका प्रचारसभेवेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
mamata banerjee
mamata banerjee

पश्चिम बंगाल: विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी (ता. 27) झाले. एकूण 294 जागांसाठी मतदान होणार असून 8 टप्प्यात ते होईल व निकाल 2 मे रोजी लागेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापल्याचे दिसून येते. बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यास बंगाली नागरिकांना भाजपकडून पश्चिम बंगालमधून हाकलून लावण्यात येईल, असे धक्कादायक वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले. नंदिग्राम येथील एका प्रचारसभेवेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या, भाजप सत्तेवर आल्यास बाहेरील गुंडांना हाताशी धरून बंगालमध्ये कब्जा मिळवला जाईल. तसेच बंगालचे अस्तित्वच संपुष्टात येईल. बंगाली नागरिकांनाही चले-जाव म्हणत हाकलून लावण्यात येईल. परंतु, तृणमूलला मतदान केल्यास बंगाली नागरिक सुरक्षित राहू शकतील, तसेच येत्या काळात आम्ही घरोघरी मोफत रेशन पोहोचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. तृणमूल सत्तेवर आल्यास नंदिग्राममध्ये एक संपर्क कार्यालय उघडणार असून भाजपने गुंडगिरी केल्यास झाडू व भांडी फेकून त्यांना हाकलून लावण्यात येईल, असेही ममता म्हणाल्या. 

दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगालच्या अल्पसंख्यांक समूदायाचे समाधान शोधण्यात व्यस्त असून ईद मुबारक म्हणण्याची त्यांना इतकी सवय झाली आहे की त्यांनी होळीच्या दिवशी हिंदू लोकांना होळीच्या शुभेच्छांऐवजी होळी मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. हे असेच सुरू राहिल्यास एक दिवस बंगालचा मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नंदिग्रामचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी या पूर्वी दिली होती. मतदारांनी सतर्क होण्याची गरज असून ममता यांना मत दिल्यास बंगाल मिनी पाकिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही, असे धक्कादायक वक्तव्यही अधिकारी यांनी केले होते. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निषाणा साधला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com