विरोधी पक्षनेतेपद 'या' नेत्याकडे...गुलाम नबी आझाद यांच्या जागी नियुक्ती.. - mallikarjun kharge to be next leader of opposition in rajya sabha  | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी पक्षनेतेपद 'या' नेत्याकडे...गुलाम नबी आझाद यांच्या जागी नियुक्ती..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

आझाद यांच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करावी, असं पत्र काँग्रेसने राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे.

नवी दिल्ली  :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार गुलाम नवी आझाद यांचा कार्यकाळ येत्या १५ तारखेला संपत आहे.  गुलाम नवी आझाद हे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. राज्यसभेतून ते गेल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

गुलाम नबी आझाद यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती राज्यसभेचे सभापती एम. वैकेया नायडू यांनी दिली आहे. खर्गे हे विरोधी पक्षनेते होतील, असे नायडू यांनी सूचित केले आहे. 

आझाद यांच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करावी, असं पत्र काँग्रेसने राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांना लिहिलं आहे. राज्यसभेत चार दशकापासून विरोधी पक्षनेता हे पद रिक्त होते, या पदी खरगे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे समजते. 

गेल्या मंगळवारी राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

 
हेही वाचा :  नरेंद्र मोदी चीनसमोर झुकले... 

नवी दिल्ली : कैलास पर्वत सारखी पवित्र भूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या ताब्यात का दिली, असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित करीत मोदींवर आज निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी  हे चीनला घाबरले असून ते चीनसमोर झुकले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की चीनबाबत नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन होऊ शकत नाही. चीनसोबत झालेल्या चर्चेत भारताला काय मिळालं याचं उत्तर मोदींनी जनतेला द्यावे.  

काल राज्यसभेत राहुल गांधी यांनी चार लोक देश चालवितात, असा आरोप मोदींवर केला होता. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काल टीकास्त्र सोडले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख