बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्य पक्षांनी गुन्हेगार उमेदवारांना दिले तिकीट - The main parties in the Bihar Assembly elections gave tickets to criminal candidates | Politics Marathi News - Sarkarnama

बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्य पक्षांनी गुन्हेगार उमेदवारांना दिले तिकीट

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही सत्ताधारी  राजद, कॉंग्रेस, लोजपा ,जदयू-भाजप  या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना पुन्हा तिकीटे देण्यांत आली आहेत.

नवी दिल्ली  : बिहार विधान सभेच्या निवणुका नोव्हेंबर मध्ये होत असून  विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही सत्ताधारी  राजद, कॉंग्रेस, लोजपा ,जदयू-भाजप  या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना पुन्हा तिकीटे देण्यांत आली आहेत.

यामुळे लोकशाही प्रक्रियेतील सुधारणांबाबत काम करणाऱ्या एडीआर संस्थेच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणातील 1463 उमेदवारांपैकी 34 टक्के उमेदवारांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. निवडणूक अर्ज भरताना स्वतःवर गुन्हे असल्याचे जाहीर करणारांची संख्या 47 % ते 64% आहे. या टप्प्यात राज्यातील अती संवेदनशील मतदारसंघ 84 टक्के मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर झाले आहेत.

न्यायालयाने यावर्षी फेब्रुवारीत राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीबाबत, "गुन्हेगारांना तिकीटे दिली तर संबंधित पक्षांनी त्याची कारणे दाखवावीत व असेच उमेदवार का निवडावे लागतात याबाबतही सांगावे' असे निर्देश देखील दिले होते. दुसऱ्या टप्प्यात ज्यांना तिकीटे मिळाली आहेत,

यामध्ये खून, अपहरण, खंडणीखोरी, बलात्कार, फरार झालेले, तुरूंगाची हवा खाऊन आलेले, अशा साऱ्या लोकांचा समावेश आहे. कायदे बनविणाऱ्या विधानभवनात  निवडून जाणाऱ्या लोकप्रतीनिधींचे किमान चारित्र्य तरी पक्षांनी पाहिले पाहिजे या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा व दिशानिर्देशांचा परिणाम राजकीय पक्षांवर बिहारमध्ये एक तर अजिबात होत नाही किंवा कमी होतो हे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे. 
-------------
उमेदवारांची आकडेवारी -
लोजपा - 52 पैकी 28 (54%) 
बसपा 33 पैकी 16 (49%)
अत्यंत गंभीर गुन्हे असलेले ः राजद - 56 पैकी 28 (50%)
लोजप - 52 पैकी 24(46%)
भाजप - 46 पैकी 20(44%)
बसपा - 33 पैकी 14(42%)
कॉंग्रेस - 24 पैकी 10(42%)
जदयू - 43 पैकी 15(35%)
हिलांवरील अत्याचारांचे गुन्हे असलेले एकूण 49
बलात्कार - 4
खून - 32 (कलम 302)
खुनाशी संबंधीत - 32 (कलम 302)
खुनाचा प्रयत्न केलेले-143 (कलम 307)
गुन्हेगारी खटले असलेले-502 (34 टक्के)
गुन्हयांची माहिती देणारे एकूण -389(27%)
राजद - 56 पैकी 36(64%)
जदयू - 43 पैकी 20 (47%)
भाजप - 46 पैकी 14 (58%)
कॉंग्रेस - 24 पैकी 14 (54%) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख