RSS मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांची 15 मे रोजी सुनावणी...

राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असा आरोप केला होता.
rahul 22.jpg
rahul 22.jpg

नवी दिल्ली : 'महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे,' असं व्यक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानी केल्याची तक्रार भिंवडी न्यायालयात दाखल आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 15 मे रोजी होणार आहे. 

भिंवडीच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. भिंवडी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिंवडी येथे राहुल गांधी यांचे भाषण ऐकल्यानंतर 2014 मध्ये याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या भाषणात राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे, असा आरोप केला होता. 

 
याप्रकरणी राहुल गांधी 2018 मध्ये भिंवडीच्या न्यायालयात हजर होते. त्यांनी आपण निदोष असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची सुनावणी नुकतीच झाली. न्यायाधीश जे. वी. पालीवाल यांच्यासमोर ही सुनावणी झाली. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी कोरोनामुळे राहुल गांधी सुनावणीस उपस्थित राहू शकणार नाही, यांची परवानगी द्यावी, अशी विंनती अय्यर यांनी न्यायालयास केली आहे.   

राजेश कुंटे यांचे वकील पी.पी. जयवंत यांनी सांगितले की, याप्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले असून खटल्याच्या सुनावणीस स्थगिती देऊ नये, अशी विनंती केली. त्याला न्यायालयाने मंजूरी दिली आहे. यावर पालिवाल यांनी सांगितले की उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला या प्रकरणाच्या सुनावणीस स्थगिती देण्याबाबत आदेश दिलेला नाही. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 मे रोजी होणार असल्याचे सांगितले. याच दिवशी तक्रारदाराचा जवाब घेतला जाण्याची शक्यता आहे.  

हेही वाचा : सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा एसी कारवरून आले सायकलवर...
नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व उद्योजक रॉबर्ट वड्रा हे इंधन दरवाढीविरोधात मैदानात उतरले आहेत. आज एसी कारऐवजी सायकवरवरून कार्यालय गाठत त्यांनी इंधन दरवाढीकडे लक्ष वेधले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससी कारमधून बाहेर पडून लोकांचे हाल पाहावेत, अशी टीकाही त्यांनी केली. मागील काही दिवसांपासून पेट्रोलसह डिझेल व गॅसचे दरही सातत्याने वाढत आहेत. काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० वर पोहचले आहेत. त्यामुळे देशभरात काँग्रेससह विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीवरून जोरदार टीका सुरू केली आहे. तसेच ठिकठिकाणी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनही केले जात आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्याने तसेच इंधर दरांवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्याचे सांगत केंद्र सरकारने हात वर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com