''निवडणूक अधिकाऱ्यांवर  खुनाचा गुन्हा दाखल  केला पाहिजे''  उच्च न्यायालयाने फटकारले...मतमोजणीवर प्रश्नचिन्ह... - madras high court slams election commission for allow political rallies during covid | Politics Marathi News - Sarkarnama

''निवडणूक अधिकाऱ्यांवर  खुनाचा गुन्हा दाखल  केला पाहिजे''  उच्च न्यायालयाने फटकारले...मतमोजणीवर प्रश्नचिन्ह...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

निवडणुकीची रॅली निघत होती, तेव्हा तुम्ही कुठे दुसऱ्या ग्रहावर होता का ?

मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने सगळेच हतबल झाले आहे. अशा परिस्थिती निवडणूक घेणाऱ्या निवडणूक आयोगाला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असल्याचे निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या नियमावलींचे पालन केले नाही, अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे.   

''निवडणूक अधिकाऱ्यांवर  खुनाचा गुन्हा दाखल  केला पाहिजे,'' अशा  शब्दात  मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले आहे. कोरोना नियमांचे पालन केले नाही, तर ता. २ मे ला होणारी विधानसभा मतमोजणी थांबवू, असा इशारा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.  मद्रास उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी आणि न्यायमूर्ती सेंथिलकुमार रामामूर्ती यांच्या  खंडपीठासमोर ही सुनावणी झाली

''निवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लघंन करण्यात आले. निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केले. दोन तारखेला होणाऱ्या मतमोजणी कार्यक्रमांची ब्लुप्रिंट सादर केली नाही तर मतमोजणीवर बंदी घालण्यात येईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. जेव्हा निवडणुकीची रॅली निघत होती, तेव्हा तुम्ही कुठे दुसऱ्या ग्रहावर होता का ? '' अशा शब्दांत मुख्य न्यायाधीश संजीव बनर्जी यांनी न्यायालयाला फटकारले आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत मतमोजणीची ब्लुप्रिंट द्या, अन्यथा मतमोजणी होणार नाही, असे न्यायालयाने नमूद केलं आहे. 

''जनतेचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यांच्या अधिकार, हक्कांना जपलं पाहिजे, एखादी व्यक्ती जींवत राहिल तरच त्याला त्याला  हक्काचा, अधिकारांचा उपयोग करता येईल. यांची जबाबदारी लोकशाहीत असते,'' असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 
Edited by : Mangesh Mahale
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख