पन्न्नास फूट उंच पाळण्यातून हे मंत्री करतात जनतेचा न्यायनिवाडा... - madhya pradesh minister brijesh yadav solving problems by going 50 feet above swing in ashok nagar | Politics Marathi News - Sarkarnama

पन्न्नास फूट उंच पाळण्यातून हे मंत्री करतात जनतेचा न्यायनिवाडा...

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

बृजेंद्र सिंह यादव पन्नास फुट उंच पाळण्यात बसून नेटवर्क मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत.

अशोक नगर (मध्यप्रदेश) : मोदी सरकार देशात 'डिजिटल इंडिया'ची मोहीम राबवित आहेत, पण ग्रामीण भागात इंटरनेट सेवा तर सोडा पण मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याचे अनेक जण त्रस्त आहे. याचा फटका मोदी सरकारच्या मंत्र्यांनाही बसत आहे.

मध्यप्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री बृजेंद्र सिंह यादव पन्नास फुट उंच पाळण्यात बसून मोबाईल नेटवर्क मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मोबाईल नेटवर्क मिळत नाही म्हणून रविवारी बृजेंद्र सिंह यादव हे मध्यप्रदेशातील एका गावात जत्रेतील 50 फूट उंच पाळण्यात बसून मोबाईलवरून जनतेच्या समस्या सोडवित होते. त्याच्यासोबत पाळण्यात त्यांचे खासगी सचिव देखील पाळण्यात बसले होते. तेथून यादव हे अधिकाऱ्याशी संपर्क करून अधिकाऱ्यांना सूचना देत होते. 

बृजेंद्र सिंह यादव यांना सध्या मुंगावली येथे सुरेल गावात एका भागवत सप्ताहाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ते नऊ दिवस त्या परिसरात मुक्कामाला आहेत. परिसरातील नागरिक त्यांच्याकडे विविध समस्या घेऊन येत असतात. त्या समस्या सोडविण्यासाठी मंत्र्यांनी ही शक्कल लढवली आहे. ते रोज या पाळण्यात बसून अधिकाऱ्यांना सूचना देत समस्य़ा सोडवित आहेत. भागवत सप्ताहानिमित्त परिसरात जत्रा भरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी लहान, मोठे पाळणे आहेत, या पाळण्याचा उपयोग नेटवर्क मिळण्यासाठी मंत्री करत आहेत. देशातील डिजिटल इंडियाचे हे दुसरे चित्र यानिमित्ताने दिसत आहे. 

 
हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या भाच्याची सीबीआय करणार चैाकशी..
 
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजा अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने काल समन्स बजावली आहे. कोळसा गैरव्यवहार प्रकरणात अभिषेक बँनर्जी यांना
सीबीआयने हे समन्स बजावले आहे. त्यांची चैाकशी लवकर होणार आहे. सीबीआयचे पथक अभिेषेक बॅनर्जी यांच्या घरी आज पोहचले होते. दोन दिवसापूर्वी सीबीआयने बंगालमध्ये 13 ठिकाणी छापे मारले आहेत. यात कोळसा गैरव्यवहार, अवैध उत्खनन, चोरी अशा प्रकरणात सहभागी असलेल्या जयदेव मंडल आणि याप्रकरणात अनेक दिवसापासून फरार असलेला कोळसा माफिया अनूप माजी उर्फे लाला यांच्या घरांचाही समाववेश आहे. कोलकाता, पुरुलिया, पश्चिम बर्धमान, बांकुड़ा आदी परिसरात सीबीआयचे धाडसत्र सुरू आहे. सीबीआयने मंडल, माजी, अमिया स्टील कंपनीच्या परिसरात छापा मारून पाहणी केली आहे. यापूर्वी सीबीआयने काही दिवसापूर्वी कोळसा गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे युवा नेता विनय मिश्रा, व्यावसायिक अमित सिंह, नीरज सिंह आदींच्या घरावर छापेमारी केली आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख