बंगालमध्ये डावे-काँग्रेस एकत्र : फायदा कोणाला... ममतांना की भाजपला? 

आता काँग्रेस व डावी आघाडी एकत्र लढणार असल्यामुळे निवडणुकीत अधिकच रंगत वाढणार आहे. मात्र, काँग्रेस व डावी आघाडी एकत्र आल्यामुळे याचा फायदा नेमका कोणाला होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Women Bose
Women Bose

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेस व डावी आघाडी एकत्र लढणार असल्यामुळे निवडणुकीत अधिकच रंगत वाढणार आहे. मात्र, काँग्रेस व डावी आघाडी एकत्र आल्यामुळे याचा फायदा नेमका कोणाला होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मागील काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी टीमसीची साथ सोडली आहे,  त्यातच आता काँग्रेस व डावी आघाडी तृणमूल काँग्रेस विरोधात एकत्र येवून निवडणूक लढणार आहेत. भाजपमुळे अगोदरच काहीशा अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जींची डोकेदुखी आता अधिकच वाढणार असल्याचे दिसत आहे. 

पश्चिम बंगालला धार्मिक ध्रुवीकरणापासून वाचवण्यासाठी आम्ही भाजप व टीएमसीविरोधात मिळून निवडणूक लढवू. आमच्यात (काँग्रेस व डावी आघाडी) कोणतेही गैरसमज नाहीत. जागा वाटपांवर अद्याप चर्चा बाकी आहे. असं डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमेन बोस यांनी म्हटलं आहे. 

या अगोदर ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांकडे मदत मागितली होती. मात्र, दोघांनी यासाठी स्पष्टपणे नकार दर्शवला होता. तर, काँग्रेसच्या एक नेत्याने ममता बॅनर्जींना आघाडी करण्यापेक्षा टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलणीकरण करण्याचाही सल्ला दिला होता. आता डाव्या पक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केल्याने, ममता बॅनर्जींना बंगालमधील आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com