Launch of Congress Party Digital Media Platform INC TV
Launch of Congress Party Digital Media Platform INC TV

भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने लाँच केलं चॅनल

डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून 'आयएनसी टीव्ही' हेचॅनल लाँच केले.

नवी दिल्ली : भाजपकडून केंद्रात सत्ता मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला होता. आता तर भाजपच्या आयटी सेलची फौजच कार्यरत आहे. फेसबुक, ट्विटर, युट्यूबसह विविध सोशल मीडियावर पंतप्रधानांसह पक्षाच्या महत्वाचे नेते, कार्यक्रमांचे अपडेट दिसतात. याबाबत काँग्रेस खूप पिछाडीवर आहे. पण आता भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्षही सज्ज होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेस मागील महिन्यातच एक मोहिम घेतली आहे. आता याअंतर्गत काँग्रेसने आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून 'आयएनसी टीव्ही' हा यूट्यूब चॅनल लाँच केला. या चॅनलवरून 24 एप्रिलपासून प्रत्यक्ष प्रसारणाला सुरूवात होणार आहे. भाजपाचे यूट्यूब चॅनेल तीन वर्षांपासून असून 36 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. 

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, रणदीप सुरजेवाला, सुष्मिता देवी, श्रीनिवास यांनी पत्रकार परिषदेमध्ये आज या चॅनलची घोषणा केली. यावेळी बोलताना सुरजेवाला म्हणाले, आज डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे भारतीय संविधान आणि संविधानिक अधिकारांचाही उत्सव आहे. आज देशात संविधान आणि संविधानिक संस्थांवर मोदी सरकारकडून हल्ला करण्यात आला आहे. आज अंधविश्वास आणि अंधभक्ती चौफेर आहे. विवेकहीनता आणि मानसिक गुलामीचे वातावरण आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला बेडीत अडकविण्याच्या युगात आयएनसी टीव्ही येत आहे, असे सुरजेवाला यांनी नमुद केले.

दरम्यान, काँग्रेसकडून सातत्याने माध्यमांवर टीका केली जाते. वृत्तवाहिन्यांकडून भाजपला झुकते माप दिले जाते. सरकारविरोधात माध्यमे बोलत नाहीत, असे आरोप काँग्रेसकडून केले जातात. अशा परिस्थितीत स्वतंत्र यूट्यूब चॅनेल सुरू करत असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. यामाध्यमातून काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत पोहचविली जाईल. तसेच मोदी सरकारच्या मनमानी कारभाराचीही पोलखोल केली जाणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

अनेक काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांकडूनही काँग्रेस सोशल मीडियापासून कोसो दुर असल्याची नाराजी व्यक्त केली जाते. त्यातुलनेत भाजपकडून प्रत्येक सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केला जातो. काँग्रेसकडून केवळ ट्विटरचा जास्त आधार घेतला जातो. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून यूट्यूब चॅनेल लाँच करण्यात आले आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com