कुमारस्वामी यांनी घेतली मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट 

दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे कर्नाटकमध्ये तर्कवितर्कांना एकच उधाण आले आहे.
Kumaraswami met to Chief Minister Yeddyurappa
Kumaraswami met to Chief Minister Yeddyurappa

बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी (ता. 11 सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली.

धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांच्या मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. मात्र, या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे कर्नाटकमध्ये तर्कवितर्कांना एकच उधाण आले आहे. 

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी येडियुरप्पा यांच्या "कृष्णा' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे हे निवासस्थान त्यांचे कार्यालयही आहे. ही भेटीवेळी साधारणपणे 20 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. 

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, की राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा करण्याठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची भेट घेतली आहे. विशेषत: धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार मंजुनाथ यांच्या दासराहल्ली मतदारसंघात पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे, मंजुनाथ यांच्या मतदारसंघाबाबत येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. या मतदारसंघासाठी आणखी निधी मंजूर करून दरवर्षी होणारे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे, असे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

कुणाची नावे उघड येतात, ते पाहू 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज प्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईत हे ड्रग्जवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्याच प्रकारे कर्नाटकमध्ये सध्या अमली पदार्थांचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या प्रकरणातील दोषींवर, ते कितीही उच्चपदस्थ असले तरी कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे, तपासात कुणाची नावे पुढे येतात, हे पाहूया, असे ही कुमारस्वामी या वेळी म्हणाले आहे. 


हेही वाचा : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आपल्याच सरकारला वैतागले 

चाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे पक्षावरच नाराज आहेत. राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही विकास कामे, अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच इतर कामे होत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बोलण्यातून ही नाराजी वारंवार स्पष्ट होत आहे. दरम्यान, यापूर्वी मोहिते यांनी तहसीलदाराच्या पतीने आपल्याला धमकी दिल्याची तक्रार केली होती. 

खेड तालुक्‍यातील जे महसुली अधिकारी गैरप्रकार करतात, त्या अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. पण, संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली नाही. नागरिकांच्याही संबंधित अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आहेत. सांगूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत.
 जे राजरोसपणे पैसे उकळतात, कोट्यवधी रुपये कमवतात, सरकारचा महसूल बुडवितात आणि दादागिरी करतात, अशा अधिकाऱ्यांचे मंत्र्यांना पुरावे दिले तरी त्यांच्या बदल्या होत नाहीत, अशी उद्विग्नता आमदार मोहिते यांनी व्यक्त केली. 

आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यामुळे नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात. पण, ती कामे होत नाहीत, त्यामुळे आमदारांनी काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com