शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई करा ; सोमय्यांनी घेतली राणेंची भेट - Kirit somaiya met minister narayan rane at delhi  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई करा ; सोमय्यांनी घेतली राणेंची भेट

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

समुद्र किनारी असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी 2016 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेकायदा बांधकामाबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. आता सोमय्यांनी दिल्लीत काल नारायण राणे यांची भेट घेऊन समुद्र किनारी असलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी असल्याचा आरोप करीत सोमय्या यांनी यापूर्वी शिवसेना नेते अनिल परब, मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांच्याविरोधात तक्रार केली आहे. Kirit somaiya met minister narayan rane at delhi 

सोमय्यांनी यांनी २०१६ मध्ये नारायण राणेंच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016 मध्ये केली होती.राणे यांच्या निलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटींचा व्यवहार असून, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. 

काल सोमय्या यांनी राणेंची भेट घेतली. याबाबतचे टि्वट त्यांनी केले आहे. आपल्या टि्वटमध्ये सोमय्या म्हणतात की, दिल्ली येथे मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली, मुरुड दापोलीच्या समुद्र किना-यावर रिसॉर्ट्स, बंगले बेकायदेशीर बांधकाम आणि त्यावर कारवाई संबंधी चर्चा केली

मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप यापूर्वी सोमय्या यांनी केला आहे, तर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली आहे. परब यांनी समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन साई रिसॉर्ट बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 

बाळासाहेबांनंतर शिवसेना बिघडली ; आता शाखांमध्ये ‘तोडपाणी’ चालते! 
मुंबई : एकेकाळी सर्वसामान्यांना मदत करणारी शिवसेना आता उरली नाही. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरणारी शिवसेना आता रस्त्यावर दिसत नाही. पूर्वी शाखाप्रमुख हा नेहमी शाखेत दिसायचा, लोकांना मदत करायचा. आता मात्र ‘त्या’ शाखांमध्ये लोकांना मदत नाही, तर ‘तोडपाणी’ चालते, असा घणाघात भाजपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी केला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख