Kerala Election 2021 : मुस्लिम लिगच्या दिग्गज नेत्याला तृतीयपंथीयाचे आव्हान - Kerala Election 2021 Transgender challenges Muslim League leader in Kerala polls | Politics Marathi News - Sarkarnama

Kerala Election 2021 : मुस्लिम लिगच्या दिग्गज नेत्याला तृतीयपंथीयाचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

अनन्या कुमारी एलेक्स या तृतीयपंथीय व्यक्तीला डीएसजेपीने तिकीट दिले आहे. 

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. वेंगरा मतदारसंघातील होणीर लढतीने सगळ्याचे लक्ष वेधलं आहे. याठिकाणी एका तृतीयपंथीयाने मुस्लिम लिगचे दिग्गज नेते पी. के. कुन्हाली कुट्टी यांना आव्हान दिले आहे. डेमोक्रॅकिट सोशल जस्टिस पार्टीने (डीएसजेपी) अनन्या कुमारी एलेक्स या तृतीयपंथीय व्यक्तीला तिकीट दिले आहे. 

राज्यातील पहिले रेडिओ जॉकी बनून अनन्या कुमारी एलेक्स यांनी विक्रम केला होता. केरळमधील एक प्रसिध्द व्यक्तीमत्व म्हणून अनन्या (वय २८) यांची ओळख आहे. मुस्लिम लीगचा गड मानल्या जाणाऱ्या वेंगरा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवित आहेत.

एलेक्स म्हणाल्या, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगले काम करून दाखवेल. माझ्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे वाटते. मी जिंकले तर सर्वांना समान वागणूक देणे ही मोठी जबाबदारी असेल. लिंग, जात-धर्माच्या आधारे वागवणार नाही. विजय झाल्यास महिला सुरक्षा, शिक्षण, अल्पसंख्याक त्यातही ट्रान्सजेंडर यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. प्रचाराची पूर्वतयारी केली आहे. एक तृतीयपंथी या नात्याने मी लोकांना मत मागणार आहे." 

अनन्या यांच्या विरोधातील उमेदवार पी. के. कुन्हाली कुट्टी हे २०११ व २०१६ दरम्यान आमदार होते. मुस्लिम लीगचे अध्यक्ष ई अहमद यांच्या निधनानंतर  २०१७ मध्ये मालाप्पुरम लोकसभा मतदारसंघातून ते पोटनिवडणुकीत उतरले आणि विजयी झाले. २०१९ मध्ये ते पुन्हा खासदार झाले. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. वेंगरात पुन्हा ते मैदानात आहेत. वेंगरामध्ये १.८२ मतदार आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के मुस्लिम आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख