ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांची राज्य करणार न्यायिक चौकशी

गुन्हे शाखेने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Kerala Cabinet decides to recommend judicial enquiry against central probe agencies
Kerala Cabinet decides to recommend judicial enquiry against central probe agencies

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्रामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांविषयी राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मनसुख हिरेने मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एसटीएसकडून एनआयएच्या हाती देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अशीच स्थिती केरळमध्येही निर्माण झाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलिस आमनेसामने आले आहेत.

सोने तस्करीच्या प्रकरणात मुख्यंमत्र्यांना गोवण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप करत केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यानंतर आज केरळमधील मंत्रीमंडळाने ईडीसह राष्ट्रीय तपास यंत्रणांची न्यायिक चौकशी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

केरळ सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा व राज्य सरकारमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. केरळमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोने तस्करीचे प्रकरण गाजत असल्याने सत्ताधारी डाव्या पक्षासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यातच एनआयएच्या ताब्यात असलेल्या स्वप्ना सुरेशची एक ध्वनीफित व्हायरल झाली. त्यामध्ये एनआयएकडून मुख्यमंत्र्यांचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा तिने केला आहे. त्यावरून केरळमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. 

या प्रकारामुळे राज्य सरकारने ईडीविरोधात पावले टाकण्यात सुरूवात केली होती. त्यानंतर केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कट रचणे, धमकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. स्पप्नाशी संबंधित अॉडिओ क्लीपची चौकशी केल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधिक्षक ई. एस. बिजुमोन यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मागील वर्षी ५ जुलै रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ व सीमा शुल्क विभागाने तिरूअनंतपुरम विमानतळावर १४ कोटी रुपयांचे ३० किलो सोने जप्त केले होते. हे सोने संयुक्त अरब अमरातीमध्ये पाठविले जाणार होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वप्ना सुरेश हिला अटक केली आहे. तिच्या चौकशीमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे प्रधान सचिव एम. शिवशंकर यांचा स्वप्ना सुरेशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पदावरून हटवत निलंबित करण्यात आले. सीमा शुल्क विभागाने ५ मार्च रोजी केरळ उच्च न्यायालयात थेट मुख्यमंत्री विजयन, त्यांचे तीन मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना सोन्याची तस्करीबाबत माहिती होती, असा दावा केला.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com