उच्चशिक्षित युवकाने नाकारले भाजपचे तिकीट..

भाजपने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 31 वर्षीय एमबीए झालेले मनीकुट्टन यांचेही नाव होते.
मनीकुट्टन16.jpg
मनीकुट्टन16.jpg

मानंतवाडी (केरळ) : विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक नेते तिकीट वाटपामध्ये गुंतले आहेत. या सर्व धामधुमीत एका उच्चशिक्षित युवकाने भाजपने दिलेले तिकीट नाकारले आहे.

भाजपने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात 31 वर्षीय एमबीए झालेले मनीकुट्टन यांचेही नाव होते. मनीकुट्टन यांना भाजपने मानंतवाडीमधून विधानसभेच्या आखाड्यात उतरविले होते. वायनाड जिल्ह्यातील मानंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा एसटीसाठी राखीव आहे.

भाजपने रविवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मनीकुट्टन यांचेही नाव आले आहे. याबाबत मनीकुट्टन म्हणाले की, मी राजकारणात येऊ इच्छित नाही. जेव्हा मी माझे नाव टिव्हीवर पाहिले, तेव्हा मला आर्श्चयाचा धक्का बसला. मला भाजपबाबत खूप आदर आहे, पण मी निवडणूक लढवू इच्छित नाही. मी सर्वसामान्य व्यक्ती असून राजकारणात मला रस नाही. मला नोकरी करायची आहे. यासाठी मला राजकारणात यायचे नाही, म्हणून मी हे तिकीट नाकारत आहेत. भाजपने पनिया समाजातून उमेदवाराची निवड केली, याचा मला आनंद आहे. पण मी निवडणूक लढवू शकत नाही, असे त्यांना मी फोनवर कळविले आहे.  

हेही वाचा : सभेतील रिकाम्या खुर्च्या अन् अमित शहांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड...
कोलकता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून प्रचारात आघाडी घेण्यात आली. ठिकठिकाणी सभा, रोड शो सुरू असून एकामेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज गृहमंत्री अमित शहा यांची झारग्रामध्ये सभा होणार होती. मात्र, त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पण सभेला अपेक्षित गर्दी नसल्याने त्यांनी येण्याचे टाळल्याची चर्चा आहे. याबाबतचा व्हिडिओ तृणमूल काँग्रेसने व्हायरल केला आहे. बंगालमध्ये प्रचारासाठी भाजपकडून प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अधिक मदार असणार आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मोदींच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्त सभा घेतल्या आहेत. पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्या सभांचा धडाका अद्याप सुरू झालेला नाही. अमित शहा हे सातत्याने बंगालमध्ये आहे. रोड शोड, बैठका, सभांच्या माध्यमातून बंगालमधील जनतेशी संवाद साधत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com