डिझेल टाका, अपहरण झालेल्या मुलीला शोधतो...पोलिसांनी आईकडेच केली मागणी - Kanpur Police demands money for searching abducted girl | Politics Marathi News - Sarkarnama

डिझेल टाका, अपहरण झालेल्या मुलीला शोधतो...पोलिसांनी आईकडेच केली मागणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या अपंग आईने महिनाभरापूर्वी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिकांडून धक्कादायक मागणी करण्यात आली.

कानपूर : सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकणाऱ् उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या अपंग आईने महिनाभरापूर्वी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिकांडून धक्कादायक मागणी करण्यात आली. ''गाडीमध्ये डिझेल टाकून दिल्यास मुलीचा शोध घ्यायला जाऊ,'' असे पोलिस म्हणत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. आतापर्यंत डिझेलसाठी 10 ते 15 हजार रुपये दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. पिडीत महिलेचे नाव गुडिया असून त्या विधवा आहेत. तसेच त्या अपंग असून आधाराशिवाय चालता येत नाही. त्यांनी मागील महिन्यात आपल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे केली आहे. पण या तक्रारीची पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलिसांविरूध्द पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, 'आम्ही शोध घेत असल्याचे पोलिस सांगतात. अनेकदा ते माझा अपमान करता. मुलीच्या चारित्र्यावरही संशय घेतात.

चीच चूक असेल, असे म्हणतात. मी पोलिसांना लाच दिलेली नाही. पण आमच्या गाडीमध्ये डिझेल टाका, मुलीचा शोध घेऊ, अशी मागणी करतात. त्यानुसार तीन-चार वेळा डिझेलसाठी पैसे दिले आहेत. त्या पोलिस चौकीत दोन कर्मचारी असून एक जण मदत करत आहे. डिझेलसाठी नातेवाईकांकडून उधारीवर पैसे घेतले. पण आता पैसे देऊ शकत नाही,' असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कानपूर पोलिसांकडून ट्विटरवरून ही माहिती दिली. 'संबंधित पोलिस चौकीच्या प्रमुखाला हटविण्यात आले आहे. या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुलीला शोधण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत,' असे नमुद करण्यात आले आहे.

महिलेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी ब्रजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख