कंगना म्हणते, ""मोदींना सामान्य भारतीयांचे जे प्रेम मिळाले तसे  कोणत्याच पंतप्रधानाला मिळाले नाही !''  - Kangana says No Prime Minister has ever loved Modi as much as ordinary Indians | Politics Marathi News - Sarkarnama

कंगना म्हणते, ""मोदींना सामान्य भारतीयांचे जे प्रेम मिळाले तसे  कोणत्याच पंतप्रधानाला मिळाले नाही !'' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावत हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहे.

नवी दिल्ली : भल्याभल्यांचा समाचार घेताना कुणाचीच भिडभाड न ठेवणारी, जीभ घसरण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सप्रिया सुळे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यापासून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह विरोधीपक्षानीही मोदींना आजच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. कंगना हिने मोदींना शुभेच्छा देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 

कंगना म्हणते, "" पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांचे विरोधात घाणेरड्या भाषेत टीका करतात. आपल्याशी बोलण्याची कधी मला संधी मिळाली नाही. जेव्हा भेटलो पण चर्चा केली नाही. पंतप्रधान मोदींना अभद्र भाषेत लोक बोलतात. पण, ते खूप कमी लोक आहेत. मात्र आपण जाणताच आहात की सामान्य भारतीय आपल्यावर खूप प्रेम करतात. कोट्यवधी लोक असे आहेत की जे सोशल मीडियावर नाहीत.

मला वाटते मोदींवर जे लोक प्रेम करतात असे प्रेम यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानाला मिळाले असे मला वाटत नाही. रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, की मोदी यांचे जीवन संतासमान आहे. देशाची सुरक्षा, गरीबांची सेवा आणि देशाचे विकासाचे स्वप्न ते पाहत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार हे मोदी सरकारचे उदाहरण आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवेविरोधक आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसे ट्विट राहुल गांधी यांनी केले असून आपणास दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : आजचा वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान
 नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : 17 सप्टेंबर 1950) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि 26 मे 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. ते 7 ऑक्‍टोबर 2001 पासून 22मे 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपच्या गुजरात विधानसभेच्या विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते. ते 2001 गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पाहिला. 

हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते संघाचे स्वयंसेवक आहेत. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी, तर आईचे नाव हिराबेन आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. ते भारताचे अतिशय प्रभावी पंतप्रधान आहेत. जनतेशी थेट संवाद करणारे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मोदींनी किशोर वयात आपल्या भावासमवेत चहाचे दुकान चालविले. तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेतांनाच ते संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1991 मध्ये कन्याकुमारी-श्रीनगर एकता यात्रेपासून त्यांचा राजकारणात उदय झाला. 1991 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी पाच राज्यांची जबाबदारी निभावली. भाजपतर्फे त्यांचे सप्टेंबर 2013 मध्ये पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार म्हणून घोषणा झाली. गुजरातमध्ये प्रचारक म्हणून संघटकाचे काम करताना त्यांनी राज्यात आपली घट्ट पकड निर्माण केली. 2001 मध्ये भाजपचे केशुभाई पटेल पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदाच एका प्रचारकाची वर्णी लागली. उत्तम संघटक, एक उत्तम प्रशासक बनू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख