kamal nath became next chief minister of madhya pradesh before byelection results
kamal nath became next chief minister of madhya pradesh before byelection results

काँग्रेसकडून कमलनाथ बनले मध्य प्रदेशचे भावी मुख्यमंत्री

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मिनी विधानसभा ठरणाऱ्या या पोटनिवडणुका राज्यातील सत्तासमीकरणे बदलू शकतात.

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. कमलनाथ यांच्यासाठी हा अस्तित्वाचा लढा ठरणार आहे. हातातून गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. आताच काँग्रेसकडून अधिकृतरीत्या त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जात आहे. एखाद्या राज्यातील पोटनिवडणुकांत भावी मुख्यमंत्री जाहीर करण्याचा प्रकार काँग्रेसकडून बहुदा पहिल्यांदाच घडला आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहेत. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर व चंबळ या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला आहे.  

कमलनाथ या निवडणुकीत काँग्रेसचा गड एकहाती लढवत असल्याचे दिसत आहे. कारण जिकडे जाईल तिकडे कमलनाथच दिसत आहे. काँग्रेसचे दिग्विजयसिंह वगळता इतर नेते प्रचारात फारसे दिसत नसून, त्यांचा प्रभावही मर्यादित दिसत आहे. काँग्रेसकडून आतापासूनच कमलनाथ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जात आहे. याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

एखाद्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून भावी मुख्यमंत्री म्हणून नेत्याचा उल्लेख होणे हे इतिहासात विरळाच आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडलवर कमलनाथ यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जात आहे. निवडणूक होण्याआधीच काँग्रेसने कमलनाथ यांना भावी मुख्यमंत्री जाहीर करुन चर्चेला तोंड फोडले आहे. कारण पोटनिवडणुकांच्या निकालावरुन राज्यातील सत्तासमीकरणे बदलू शकतात पण यासाठी काँग्रेसला जवळपास सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. याचबरोबर मायावती यांचा बहुजन समाज पक्षही रिंगणात उतरल्याने लढती आणखी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com